नेबापुर मध्ये तुटलेल्या तारेचा करंट बसल्यामुळे माय लेकरांचा दुर्दैवी अंत!

 नेबापुर मध्ये तुटलेल्या तारेचा करंट बसल्यामुळे माय लेकरांचा दुर्दैवी अंत!

आज सकाळी सातच्या सुमारास पेरणीसाठी जमदारकी नावाच्या शेतामध्ये गेले होते त्या शेतात महावितरण ची दोन खांबाला जोडलेली विद्युत प्रवाह तार तुटलेली होती या तारेला अजयचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसला हा प्रकार पाहून आई नंदा मगदूम या आजयला सोडवण्यासाठी गेली असता त्यांना देखील विजेचा झटका बसला दोघांनाही कसलीही मदत न मिळाल्याने या माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला एकाच वेळी माय लेकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नेबापूर सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस पाटील रघुनाथ भोसले माजी सरपंच शिवाजी मोरे अभय पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचे पचनामे करून नातेवाईकांना ताब्यात दिले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केले होते दरम्यान घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांमधून महावितरणच्या या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे या तुटलेल्या तारे बदल महावितरणचे कर्मचारी गाफील कसे राहिले हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.