सातारा पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम सेवानिवृत्त समारंभ ३०जुनला होणार.
सातारा पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम सेवानिवृत्त समारंभ ३०जुनला होणार.
सातारा पंचायत समिती येथील सतत कार्यरत असणारे लोकाभिमुख सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम हे एकोणचाळिस वर्षाच्या सेवेतून निवृत्त होत आहे. त्यानिमित्त आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता निकम साहेब म्हणाले की,मी १/१०/१९८४ रोजी ग्रामसेवक म्हणून नांदगाव तालुका सातारा येथे कामाला सुरुवात केली. ९ वर्षे सलगपणे ग्रामसेवक म्हणून काम केले. १९९४रोजी ग्रामविसतार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. कोरेगाव येथे बी डी ओ म्हणून शिरढोण,लासुरणे येथे काम केले.२००१ते२०१३ मेंढा येथे विस्तार अधिकारी म्हणून काम केले. पुन्हा २०१३ते२०२३ पर्यंत सातारा येथे विस्तार अधिकारी म्हणून काम केले व ६ सप्टेंबर २०२३पासुन सातारा पंचायत समिती मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम केले. काम करताना आदर्श ग्रामसेवक, आदर्श विस्तार अधिकारी,व आदर्श ग्राम विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सातारा यांनी कामाची पोहोच म्हणून गुणगौरव करून पदोन्नती दिली. काम करीत असताना नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन काम करत राहणे अशी भूमिका घेतली. दिनांक ३०जुन रोजी त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पंचायत समिती सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे पंचायत समिती सातारा यांच्या उपस्थितीत होणार आहे. फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment