औंध व कुडाळ मुस्लिम जमातीने हिंन्दू धर्माचा केला आदर.
औंध व कुडाळ मुस्लिम जमातीने हिंन्दू धर्माचा केला आदर.
औंध येथील मुस्लीम जमातीने बकरी ईद दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे . ईदच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी केली जाईल असे औंध मुस्लिम कार्यकारणीचे अध्यक्ष हरुण शेख , उपध्यक्ष मुराद मुलाणी , खजिनदार समशेर खान , इलियाज पटवेकरी व इतर मुस्लिम जमात सदस्य यांनी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने हिन्दू समाजाच्या भावनांच्या आदर करत बकरी ईदला कुर्बानी नकता ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बान केली जाईल असे पत्र औधचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दराडे यांना पत्र दिले . तसेच.जावळी तालुक्यातील कुडाळ या ठिकाणीचे मुस्लिम समाजाने हि आपली बाधलकी जपत कुर्बान न करण्याचा निर्णय घेतला या वेळी जावळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वासीम शेख , व कुडाळ येथील मुस्लिम समाजा बांधव उपस्थित होते त्यांनी हा निर्णय घेवून सर्व समाजा समोर जावळी तालुक्या हिन्दू - मुस्लीम एकतेचा आर्दश घालून दिला.कुर्बान नकरण्याच्या निर्णयामुळे औंध व कुडाळ मधील हिन्दू समाज व मुस्लिम समाजाचे ऐकीचे बळ निर्माण झाल्याचे दिसून येते . हिन्दू व मुस्तिम समाजाचे बंधुभाव व एकमेंकाचे ऐकीचे प्रतिक आणि या बाबतचे एकमेंकाच्या समाजाचा संस्कृतीचा आदर व एकत्री करण्याचा भावनाचे दर्शन घडते .मुस्लिम समाजाने एकादशी दिवसी कृर्बान नकरण्याचा निणयाचे हिन्दू समाजा कडून कैतुक होत आहे .हिन्दू समाजाने मुस्लिम समाजाला ईदचा शुभेच्छा दिल्या व मुस्लिम समाजाकडून हिन्दूना आषाढी एकादशीचा हार्दिक शुभेच्छा दिल्या दोन्ही समाजाने एकमेकांचा भावनेचा आदर राखला.
Comments
Post a Comment