मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मंगळवारी ४जुलै रोजी अठरा नागरी सुविधांसाठी बैठक.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मंगळवारी ४जुलै रोजी अठरा नागरी सुविधांसाठी बैठक.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आले असता प्रत्येक गावात शासकीय योजना अंतर्गत १८ नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांना निवेदन दिले होते . यांची दखल घेत त्यांनी अधिका-यांना सुचना दिल्या. दरम्यान मंगळवारी चार जुलै रोजी तापोळा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी महाबळेश्वर व जावली गटविकास अधिकारी यांना देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना उपस्थित राहण्यासाठी आदेश दिले आहेत. या नागरी सुविधा सोळशी विभाग ३२गावे, कोयना विभाग ४३ गावे,कांदाटी विभाग १६ गावे, बामणोली विभाग १४ गावे अशी मिळुन १०५ गावांचा समावेश आहे. १८सुविधा या कोयना पुनर्वसन मध्ये असणाऱ्या गावांना आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकारी यांना १०५ गावांना लाभ देण्यात यावा असा आदेश दिला. पुलं आणि रस्ते यांचा आराखडा तयार करून कामे सुरू आहेत. या सार्वजनिक कामाबरोबरच गावातील अंतर्गत कामे पूर्ण झाली तर गावे सक्षम होतील, पिण्याचे पाणी सर्व गावांना उपलब्ध झाले पाहिजे यासाठी गरज असेल तेथे आवश्यक ती तजवीज करावी याचीही माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. युवासेना उप जिल्हा प्रमुख विशाल सपकाळ, तालुका प्रमुख अजित सपकाळ,संघटक गणेश उतेकर,राम सपकाळ यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा केला होता.
Comments
Post a Comment