राजू शेट्टी यांनी स्टंटबाजी बंद करावी.
राजू शेट्टी यांनी स्टंटबाजी बंद करावी.
----------------------------------------
जयशिंगपुर प्रतिनिधी
----------------------------------------
यड्रावकरांच्या संस्थेची मापे काढण्या अगोदर आपण सुरू केलेल्या संस्थांबद्दल आत्मचिंतन करा.डॉ. दशरथ काळे
जयसिंगपूर;-राजू शेट्टी एखाद्या गोष्टीचा स्टंट करण्यात पारंगत आहेत, जिल्हा बँकेत जसा स्टंट केला तसे अनेक स्टंट येणाऱ्या वर्षभरात ते करत राहतील जनतेने त्यांना जिल्हा व तालुका पातळीवर नाकारले आहे, तरीही मला सर्व पक्षाची ऑफर आहे असा विनोद माध्यमांसमोर ते करीत आहेत, स्टंटबाजी हे राजू शेट्टी यांचे जुने हत्यार आहे परंतु ते आता कालबाह्य झाल्याने त्यांनी ते बंद करावे व यड्रावकरांच्या संस्थांची मापे काढण्यापेक्षा स्वतः दहा संस्था कागदावर उभा करून त्यातील उभ्या असलेल्या संस्था कशा सुरू आहेत याचे आत्मचिंतन करावे असा सवाल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर दशरथ काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे, शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील एका सेवा संस्थेस जिल्हा बँक हमीपत्र देत नाही या विषयावरून शेट्टी यांनी मंगळवारी जिल्हा बँकेत जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, हमीपत्र मागणाऱ्या नियोजित विमलनाथ चौगुले सेवा सोसायटीने जी 151 सभासदांची यादी जिल्हा बँकेकडे सादर केली आहे, यामध्ये जनता विकास सेवा सोसायटी अकिवाट या अस्तित्वात असलेल्या संस्थेचे 47 सभासद आहेत, अस्तित्वात असलेल्या रघुवीर आवटी सेवा सोसायटीचे 19 तर जय किसान सेवा सोसायटीचे नऊ अशा 73 इतर संस्थेतील सभासदांचा प्रस्तावात समावेश आहे, 151 सभासद यादी मधील 73 सभासद हे इतर संस्थेमधील आहेत आणि विशेष म्हणजे यातील काही सभासद अस्तित्वात असलेल्या सेवा सोसायटीचे संचालक आहेत, जिल्हा बँकेचे ध्येय धोरण अथवा निकष संचालक म्हणून एकटे राजेंद्र पाटील यड्रावकर ठरवत नसतात ते संचालक मंडळाचे धोरण असते, बँकेचे निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना हमीपत्र दिले जाते, यापूर्वी उदगाव येथील बळीराजा सेवा सोसायटी व निमशिरगाव येथील स्वाभिमानी विकास सेवा संस्थेस हमीपत्र दिले त्यावेळी देखील राजेंद्र पाटील यड्रावकरच संचालक होते, राजकारण करावयाचे असते तर त्यांनी त्यावेळीही केले असते, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आजपर्यंत राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कधीही काम केले नाही, निकष पूर्ण केलेल्या संस्थाना त्यावेळी हमीपत्र दिले होते याची खासदार शेट्टी यांनी माहिती घ्यावी असेही डॉक्टर काळे यांनी पत्रकात म्हटले आहे, राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले यड्रावकरांचा संस्था बुडवण्याचा इतिहास आहे, त्यांच्या माहितीसाठी सांगतो यड्रावकरांच्या सर्व संस्था उत्तम आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, यड्रावकर उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांमधून त्यांनी जवळपास 12 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे पुण्य यड्रावकरानी केले आहे, तरुणांच्या हातात दगड देऊन त्यांना विध्वंस करण्यास कधी प्रवृत्त केले नाही, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आजही जवळपास 9000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व यापूर्वी हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून देशभरातील विविध संस्थांमध्ये आज ते कार्यरत आहेत, शेट्टी यांनी उभारलेल्या स्वाभिमानी को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट नांदणी या संस्थेची सध्या काय अवस्था आहे हे राजू शेट्टी यांनी कधीतरी सांगावे एम. ओ. एफ. पी. आय. योजनेतून शासना कडून जवळपास सात कोटी रुपये सबसिडी मिळवली आहे वसाहती मधील उद्योजकांना यातून आपण कोणत्या सवलती दिलात, कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिला, उद्योग उभारणीसाठी वसाहतीमध्ये प्लॉट उपलब्ध करून देतो म्हणून आपण शेतकऱ्यांच्या मुलांकडून पैसे घेतले आहेत त्यापैकी किती उद्योजकांना आपण प्लॉट दिले, किती तरुणांना काम दिले किती उद्योजक बनवले याचे आत्मपरीक्षण करावे, वसाहती मधील व्यापारी देणे भागवले का, निमशिरगाव पाणीपुरवठा योजनेची काय अवस्था आहे तालुक्यातील इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या तुलनेत आपण शेतकऱ्याकडून वार्षिक किती वर्गणी घेता? शेतकऱ्याला किती दिवसाला पाणी दिले जात आहे, आपला स्वाभिमानी दूध संघ गोकुळच्या तुलनेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना किती दर देतो, दूध उत्पादकांना कोणत्या सेवा सुविधा पुरवतो, शाहूवाडी तालुक्यात आपण घोषित केलेल्या स्वाभिमानी राईस मिल चे काय झाले, भूमाता भाजीपाला प्रक्रिया संस्था उदगाव या संस्थेची सध्या काय अवस्था आहे, स्वाभिमानी पतसंस्था ची परिस्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींबाबत शिरोळ तालुक्याला सर्व इतिहास माहीत आहे, त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी व स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांचे सुरू असलेले हे उद्योग त्यांनी बंद करावेत यातच त्यांचे हित आहे असेही डॉक्टर दशरथ काळे यांनी पत्रकात शेवटी म्हंटले आहे.
Comments
Post a Comment