Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वॉट्सअप कॉलिंग बनले प्रशासकीय लोकांचे नेटवर्क करण्याचे साधन.

वॉट्सअप कॉलिंग बनले प्रशासकीय लोकांचे नेटवर्क करण्याचे साधन.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.

जयशिंगपूर प्रतिनिधी 

राहुल कांबळे

----------------------------

आज जगभरात मोबाईल फोन चा वापर जवळपास सगळ्यच ठिकाणी केला आज जीवनात मोबाईल ही माणसाची मूलभूत गरज बनली आहे मोबाईल शिवाय पप्रत्येक व्यक्ती अपुरी आहे. त्यात मोबाईल ने आपल्या विश्वात इतकी प्रगती केली आहे कि प्रत्येकाचे सत्तर टक्के काम हे मोबाईल वर होते याकरिता केत्येक लेखकांनी मोबाईल श्राप कि वरदान यावर लेख लिहायचे काय कमी होत नाही.वॉट्सअप हे मोबाईल वरील इतके महत्वपूर्ण अप्लिकेशन बनले आहे कि आज प्रत्येकाचा वॉट्सअप बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही जेवढा नफा या मोबाईल वरील वॉट्सअप चा आहे तेवढच सोपं या काळे काम करणाऱ्यांसाठी मग ते काळे काम करणारे प्रशासकीय अधिकारी असो किव्हा कोणी राजकीय किव्हा इतर कोणी सामान्य व्यक्ती वॉट्सअप कॉलिंग चा पुरेपूर फायदा कोणाला होत असेल तर या लोकांना. एखादी गावगुंडाला खंडणी मागायची असेल तर वॉट्सअप कॉलिंग एखाद्या प्रशासकीय व्यक्तीला लाच मागायची असेल तर वॉट्सअप कॉलिंग आणि एखाद्या राजकीय व्यक्तीला अनधिकृत काम करवून घ्यायचे असेल तर वॉट्सअप कॉलिंग. अन्यथा वॉट्सप कॉलिंग चा उपयोग सर्वसामान्यच्या जीवनात लागतोयच कश्याला?आज काल या वॉट्सअप कॉलिंग चा उपयोग हा पोलीस कर्मचाऱ्यांना जास्त होताना दिसत आहे कारण अवैध्य व्यवसाय धारकांशी बोलण्यासाठी पोलीस कर्मचारी वॉट्सअप कॉलिंग वापरताना दिसतात याचे एकमेव कारण म्हणजे वॉट्सअप कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकत नाही आणि CDR काढलं कि कॉल डिटेल सापडत नाही याचा अर्थ वॉट्सअप कॉलिंग पोलिसांनासाठी एक वरदान च आहे. या आधुनिक युगात वॉट्सअप कॉलिंग वर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करणे आता गरज बनली आहे. यामुळे कदाचित कित्येक गुन्हेगारांना गुन्हे करताना आळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments