दुचाकी चोरट्यावर बोरगावं पोलीस यांची कडक कारवाई .
दुचाकी चोरट्यावर बोरगावं पोलीस यांची कडक कारवाई .
बोरगाव:-रोजी,12.25 वाजनेच्या सुमारास,बोरगावं पोलीस ठाणे हद्दीमध्ये,गुन्हेप्रकटिकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे नियमित पेट्रोलिंग ड्युटी करत असताना, मौजे नागठाणे ता. जी. सातारा. नागठाणे चौकजवळ, बोरगाव पोलीस अभिलेखावर गुन्हे करणारा( पोलिसांना ठाऊक असणारा.) गुन्हेगार नाव संभाजी बबन जाधव. राहणार अतीत, ता.जि.सातारा.हा स्वतः सुजुकी कम्पनी ची लाल रंगाची स्कुटी घेऊन जात असताना पोलीस अंमलदार यांना आढळला. संशयित हालचालीमुळे त्याला पकडण्यात यश आले,असे पोलिसांनी खुलासा करत सांगितले. मोटार सायकल क्रमांक MH11- CA-4825. ही मोटार सायकल विसावा पार्क सातारा येथून 22/05/2023 रोजी सायंकाळी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. सदर मोटर सायकल बाबत सातारा पोलीस स्टेशन येथे, गु. रजि नं. 416/2023. भा.द.वि.स. 379 प्रमाणे -22/05/2023 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निस्पन्न झाले आहे. त्यानंतर सदर आरोपीवर बोरगाव पोलीस ठाणे. गुन्हेगार रजिस्टर नंबर 277/2023. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे. गुन्हा दाखल करून कारवाई करणेत आली आहे. सदरची कारवाई- माननीय समीर शेख( पोलीस अधीक्षक सातारा.) मा.बापू बांगर(अपर पोलीस अधीक्षक सातारा). मा. किरण कुमार सर्यवंशी. ( पोलीस उपाधीक्षक सातारा शहर ). यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र तेलततुंबडे(सहाय्यक पोलीस निरीक्षक). पोलीस हेड कॉन्स्टेबल- प्रवीण शिंदे, (पोलीस नाईक) दादा स्वामी. यांनी कर्तव्य दक्ष अशी कामगिरी केली.
Comments
Post a Comment