सापडे येथील युवकास मारहाण प्रकरणातील तिघे संशयित बोरगाव पोलिसांच्या ताब्यात.
सापडे येथील युवकास मारहाण प्रकरणातील तिघे संशयित बोरगाव पोलिसांच्या ताब्यात.
सासपडे तालुका सातारा येथील युवकास मारहाण करून जखमी केल्याबद्दल फरार असणारे तीन आरोपी बोरगाव पोलीसांनी अटक केली. त्यांना २जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. वैभव विजय साळुंखे, राहणार नागठाणे , रोहित सुरेश यादव, राहणार अतित व तुषार निशिकांत , राहणार अतित अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी केदार अप्पा यादव, राहणार सासपडे तालुका सातारा या युवकाला कोर्टात असणारी जुनी केस काढून घे म्हणून अंगावर गाडी घालून व लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी पट्ट्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. वैभव विजय साळुंखे, अमित शिवाजी यादव, तुषार निशिकांत यादव, रोहित यादव,रोहन महादेव यादव , अभिजित उर्फ अभय भिकु यादव,अक्षय शहाजी निकम, अल्ताफ गवंडी या ९ जणांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १५ एप्रिल रोजी सासपडे गावची यात्रा होती. त्यादिवशी केदार अप्पा यादव याला वैभव साळुंखे व त्यांच्या आठ साथीदारांसह लाकडी दांडके , लोखंडी रॉडने हातावर,पाठीत तसेच डोक्यावर मारहाण करून जखमी केले होते., असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तीन संशयित गेल्या महिनाभरापासून पोलीसांना गुंगारा देत होते. गुरूवारी सकाळी दहा वाजता वरील तीन संशयित नागठाणे परिसरात फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. बोरगाव पोलीसांनी फरार तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना २ जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई सपोनि रविंद्र तेलतुंबडे, पोलिस दादा स्वामी, महादेव जानकर, विशाल जाधव यांनी केली.
Comments
Post a Comment