सात पेटंट द्वार मगदूम अभियांत्रिकेचे संशोधनात यश.
सात पेटंट द्वार मगदूम अभियांत्रिकेचे संशोधनात यश.
-------------------------------
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
-------------------------------
जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या सात संशोधनपर पेटंट्सना मान्यता मिळाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ. डी. बी. देसाई यांनी दिली.
अभियांत्रिकीचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर स्वतःचा व्यवसाय,उच्च शिक्षण, संशोधन व चांगली नोकरी असे पर्याय उपलब्ध असतात. तथापि संशोधनाकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी महाविद्यालयाने रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलची स्थापना केली आहे त्यास अनुसरून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने या कक्षाने मिळवलेले हे यश आहे असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस.बी. पाटील यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशनचे ०२, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे ०२, मेकॅनिकलचे ०२ व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ०१ अशा विविध शाखेतून आलेले हे सात पेटंट्स अगदी समाज व औद्योगीकक्षेत्राची गरज ओळखून संशोधन केलेले आहे व भविष्यात या संशोधनाचा वापर या क्षेत्रामध्ये निश्चित होईल असा विश्वास महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी व्यक्त केला. ई.टी.सी. मधील प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलमास पटेल, तैझिनाथ अशपाक देसाई व नईम इनामदार या विद्यार्थ्यांनी तर शेख मोहम्मदअसील मेहबूब, तेरदाळे वेदिका बाळासो, शर्मा सोनाली महंतलाल यांनी प्रा. पी.पी. बेलगली यांच्या मार्गदर्शनाखाली,कॉम्प्युटरच्या डॉ.डी. ए. निकम व प्रा. अर्चना गुंडवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित तोडकर, शुभम पाटील, ऋषिकेश घार्गे,वेदा मिणचेकर, शुभम अजमाने, अभिजीत नेजे, बाहर खेडकर, श्रेया कौलगे यांनी पेटंट फाईल केले आहेत. सम्मेद चौगुले, मोमीन जकाते, अनुप खुरपे, सायली पाठक या मेकॅनिकल च्या विद्यार्थ्यांना प्रा. एस. एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गिरीधर मोरे, अनुश्री गाढवे , ऐश्वर्या डुबल, प्रणाली बोबडे, शुभम ऐनापुरे,रोहित पाटील या विद्यार्थ्यांनी प्रा.एस. एम. शेख, प्रा.अडदंडे व प्रा.एन.एस. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम केले आहे. आय.टी. विभागाच्या प्रा. आर. ए. भारतीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदनान बालबंद , आर्या साळुंखे, प्राजक्ता जाधव, पार्थ शहा या विद्यार्थ्यांनी आपला पेटंट सादर केला आहे.
पेटंट सादर केलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापvकाचे अभिनंदन डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम यांनी केले व भविष्यात अशा संशोधनपर कामास महाविद्यालय आपल्या सोबत सदैव असेल असे प्रोत्साहन दिले.
Comments
Post a Comment