शाहूवाडी तालुक्यातीलनिनाई परळी येथील श्री.नथुराम आंब्रे वय ६० वर्ष यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
शाहूवाडी तालुक्यातीलनिनाई परळी येथील श्री.नथुराम आंब्रे वय ६० वर्ष यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
शाहूवाडी: तालुक्यातील निनाई परळी गावचे रहिवासी श्री.नथुराम आंब्रे यांने एक महिन्यापूर्वी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. मुंबई येथे एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये (टोटल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख ५० हजार रु.अपेक्षित खर्च येणार होता. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोन वरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले.
टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सॉकेट व मांडीच्या हाडाचे शीर (बॉल) हे दोन्हीही कृत्रिम इम्प्लॉंटचा वापर करून बदलले जातात. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो, वेदना कमी होतात, हालचालीत सुलभता व सहजता येण्याच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरत आहे. असे एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांनी सांगितले.
आज वारणानगर येथे जनसंपर्क कार्यालयात श्री.नथुराम आंब्रे यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेतली. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष इनामदार,संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment