रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर मलकापूर जवळ अपघात.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर मलकापूर जवळ अपघात.
---------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
आज दुपारी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर नजीक मालवाहतूक ट्रक आणि कारचा अपघात झाला.
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बांबवडे मलकापूर तसेच शाहूवाडी या ठिकाणी अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूने व्यापार पेठ या कारणांनी कायम वाहतुकीची कोंडी असते. आज दुपारी दीडच्या दरम्यान रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली असली तरी, वेग नियंत्रित असल्यामुळे अपघाताची भीषणता सौम्य होती. मात्र या अपघाताने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सदरच्या ठिकाणी शाहूवाडी पोलिसांनी येत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment