दुचाकी चोरटे शाहुपुरी सातारा पोलीसांच्या ताब्यात, गुन्ह्यांची कबुली.

 दुचाकी चोरटे शाहुपुरी सातारा पोलीसांच्या ताब्यात, गुन्ह्यांची कबुली.

गेल्या काही दिवसांपासून शाहुपुरी बरोबरच सातारा मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत दिनांक १२जुन रोजी राजवाडामंड ई परिसरात दुचाकी चोरी झाली होती. पोलीसांनी  घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका संशयिताची माहिती मिळाली. तो संशयित सातारच्या नगरवाचनालय परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली. यावेळी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली देवून दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सचिन बबन भोसले,वय २३, राहणार मंगळवार पेठ सातारा व सचिन अरुण दिक्षित,वय २३‌राहणार बिरजाईवाडी तालुका कोरेगाव अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान १८ जुन रोजी शाहुपुरी पोलिस सातारा येथील चोरी झालेली दुचाकी वाई येथे एक संशयित व्यक्ती वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाई येथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी संशयिताकडुन दुचाकी जप्त केली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत बधे, पोलिस लैलैश फडतरे, सुरेश घोडके,अमित माने, स्वप्नील कुंभार, निलेश काटकर, महेश बनकर,अभय साबळे, अब्दुल खलिफा यांनी कारवाईत भाग घेतला

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.