श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परळी मध्ये 11 वी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न.

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परळी मध्ये 11 वी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न.

परळी: -शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इ 11वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 11वी चे वर्ग दिनांक 28जुन पासून सुरू झाले. या विद्यार्थ्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करण्यासाठी परळी गावाचे प्रमुख सरपंच मा.बाळासाहेब जाधव पाटील, उपसरपंच मा.नंदकुमार धोत्रे,संस्थेचे विभागीय सदस्य मा.गजानन बोबडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद माजी विद्यार्थी संघ व उरमोडी  समन्वय युवा मंच यांनी दिलेल्या वह्या व गुलाबपुष्प देवून करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने झाला.त्यानंतर प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री बामणे सर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देवून करण्यात आले.त्यानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयी माहिती दिली.त्यानतंर ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापक श्री अरविंद होगाडे सर यांनी कॉलेजच्या उपक्रमाविषयी माहिती दिली मान्यवरांनी 11 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन 12 वी ची विद्यार्थिनी श्रावणी लोहार हिने केले तर आभार ओमकार शिरटावले याने मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.