Posts

Showing posts from June, 2023

कायदेविषयक ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवा: गीता पाटील.

Image
 कायदेविषयक ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवा: गीता पाटील. गांधीनगरात:- विद्यार्थ्यांनी आपल्या संरक्षणार्थ असणारे कायदेविषयकचे ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम करण्याची गरज आहे. असे मत करवीर विभाग  निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षका गीता पाटील यांनी केले. त्या गांधीनगर  येथे संत शांतीप्रकाश हायस्कूल व इंग्लिश मीडियम शाळेत आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. शाळेचे व्हाईस चेअरमन अनिल तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपनिरीक्षक गीता पाटील यांनी  सक्षम शाळा, सुदृढ शाळा, पोक्सो कायदा, सायबर कायदे, मोटर वाहन कायदे, निर्भया पथकाचे कामकाज, स्वरक्षणासाठी असणारी हेल्पलाइन नंबर, तक्रार पेटी, सोशल मीडियाचा वापर तसेच हुल्लडबाज टवाळखोर, मुलांकडून होणाऱ्या त्रासापासून  घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा यावरील कोणतेही तक्रारी विषयी निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन गीता पाटील यांनी केले. यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षका जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले. या कार

श्रीपाद जाधव सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी.

Image
 श्रीपाद जाधव सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी. सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांची सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग वाई येथे उप अभियंता म्हणून कार्यरत असताना श्रीपाद जाधव यांची  आकटोबर महिन्यात पदोन्नतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता पदी बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद मध्ये बदल्यांचे वारे वाहू लागले होते. श्रीपाद जाधव यांनीही विनंती बदलीसाठी मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा येथे श्रीपाद जाधव यांची बदली झाली आहे.याचबरोबर कुंडल विकास,प्रशासन‌ व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल तालुका पलुस येथील सहयोगी प्राध्यापक अविनाश देशमुख यांचीही सातारा जिल्हा परिषदेच्या उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर बदली झाली आहे.

सर्व सामान्य नागरिकांसाठी काम करणार :-प्रांताधिकारी सुधाकर भोसले सातारा.

Image
 सर्व सामान्य नागरिकांसाठी काम करणार :-प्रांताधिकारी सुधाकर भोसले सातारा.   सातारा येथील वादग्रस्त ठरलेल्या प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या जागी शासनाने प्रांताधिकारी म्हणून सुधाकर भोसले यांची नियुक्ती केली आहे.  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी नुकतेच प्रांताधिकारी कार्यालयात संवाद साधला असता प्रांताधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, जेव्हा मी उपलब्ध कार्यालयात असेन तेव्हा ‌नागरिक केव्हाही त्यांच्या कामासाठी भेटु शकतात. तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत विविध ठिकाणी  प्रामुख्याने ठोसेघर, मर्ढे व इतर ग्रामीण भागात नागरिकांनी संवाद साधताना शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड , विविध प्रकारचे दाखले, अवजारे वाटप करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना जागेवरच माझ्या पातळीवर असणारे निर्णय देऊन प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे.  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

शाहूवाडी तालुक्यातीलनिनाई परळी येथील श्री.नथुराम आंब्रे वय ६० वर्ष यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

Image
 शाहूवाडी तालुक्यातीलनिनाई परळी येथील श्री.नथुराम आंब्रे वय ६० वर्ष यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------- शाहूवाडी: तालुक्यातील निनाई परळी गावचे रहिवासी श्री.नथुराम आंब्रे यांने एक महिन्यापूर्वी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. मुंबई येथे एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये (टोटल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख ५० हजार रु.अपेक्षित खर्च येणार होता. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोन वरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले. टोटल हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेले सॉकेट व मांडीच्या हाडाचे शीर (बॉल) हे दोन्हीही कृत्रिम इम्प्लॉंटचा वापर करून बदलले जातात. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो, वेदना कमी होतात, हालचालीत सुलभता व सहजता येण्याच्या दृष्टीने ही

सापडे येथील युवकास मारहाण प्रकरणातील तिघे ‌संशयित बोरगाव पोलिसांच्या ताब्यात.

Image
 सापडे येथील युवकास मारहाण प्रकरणातील तिघे ‌संशयित बोरगाव पोलिसांच्या ताब्यात. सासपडे तालुका सातारा येथील युवकास मारहाण करून जखमी केल्याबद्दल फरार असणारे तीन आरोपी बोरगाव पोलीसांनी अटक केली. त्यांना २जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. वैभव‌ विजय साळुंखे, राहणार नागठाणे , रोहित सुरेश यादव, राहणार अतित व तुषार निशिकांत , राहणार अतित अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी केदार अप्पा यादव, राहणार ‌सासपडे तालुका सातारा या युवकाला ‌ कोर्टात असणारी जुनी केस काढून ‌घे म्हणून अंगावर गाडी घालून ‌व लाकडी ‌ दांडक्याने तसेच लोखंडी पट्ट्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. वैभव विजय साळुंखे, अमित शिवाजी यादव, तुषार निशिकांत यादव, रोहित यादव,रोहन महादेव यादव , अभिजित उर्फ अभय भिकु यादव,अक्षय शहाजी निकम, अल्ताफ गवंडी ‌या ९ जणांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १५‌ एप्रिल रोजी सासपडे ‌गावची यात्रा होती. त्यादिवशी केदार ‌ अप्पा यादव याला वैभव साळुंखे व त्यांच्या ‌आठ साथीदारांसह लाकडी दांडके , लोखंडी रॉडने ‌हातावर,पाठीत तसेच डोक्यावर मारहाण करून जखमी

सात पेटंट द्वार मगदूम अभियांत्रिकेचे संशोधनात यश.

Image
 सात पेटंट द्वार मगदूम अभियांत्रिकेचे संशोधनात यश. ------------------------------- जयसिंगपूर/ प्रतिनिधी ------------------------------- जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली  बनवलेल्या सात संशोधनपर पेटंट्सना मान्यता मिळाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन डॉ. डी. बी. देसाई यांनी दिली.   अभियांत्रिकीचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर स्वतःचा व्यवसाय,उच्च शिक्षण, संशोधन व चांगली नोकरी असे पर्याय उपलब्ध असतात. तथापि संशोधनाकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी  महाविद्यालयाने रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलची स्थापना केली आहे त्यास अनुसरून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने या कक्षाने मिळवलेले हे यश आहे असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस.बी. पाटील यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशनचे ०२, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे ०२, मेकॅनिकलचे ०२ व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ०१ अशा विविध शाखेतून आलेले हे सात पेटंट्स अगदी समाज व औद्योगीकक्षेत्राची गरज ओळखून संशोधन केलेले आहे व भ

नुने पिकअप शेड तळीरामाचा ध्रुम पानाचा आडा.

Image
 नुने पिकअप शेड तळीरामाचा ध्रुम पानाचा आडा.  सातारा महाबळेश्वर ह्या चार पदरी रस्त्यावर नुने नावाचे गाव ' सुप्रसिद्ध गाव सर्व जातिधर्माचे लोक गुणी - गोविंदाने नांदतात तेथे सहकारी व शासकीय सर्व सुख सोयी आहेत ऐवढे सर्व असताना एक मनात खंत येते ती हे दृष्य पाहुण समोरील पिकअप शेड पुर्वी रहदारीचे होते चहाचा स्टॉल सुधा होता आता शेड आहे पण नसल्या सारखे आहे कारण तेथे चिलीम गाज्या ओढण्यासाठी तळीरामाचा आडाच बनला आहे पण हे दिवसा ढवळ्या हा प्रकार चालतो कसा ? हा प्रकार पाहुण हि संबधीत खात्यातील व पोलिस वर्धीतीने कितेक शासकीय कामगार ये - जा करताता त्यांच्या नजरेस हा प्रकार येत नाही का ? हाम ही चूप - तुम्हही चूप कसा प्रकार आहे कि काय ? असा सवाल जनतेतून उमटत आहे. तर संबधीत खात्याने याचा बंदोबस्तात करावा हि नुने ग्रामस्थांची मागणी आहे.

आता लोकेशन सिलेक्ट करून खरेदी करता येणार सिडकोचे घर.

Image
 आता लोकेशन सिलेक्ट करून खरेदी करता येणार सिडकोचे घर. नवी मुंबई :- नवी मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडको परवडणारी घरे देते. सिडकोच्या सोडतीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सिडकोने आता एक मोठी ऑफर आणली आहे. या योजनेला सिलेक्ट माय सिडको होम (Select My CIDCO Home) असे म्हणतात. या योजनेअंतर्गत आपल्याला हवी ती जागा निवडून घर खरेदी करता येते. बृहन्मुंबई परिसरात घराच्या शोधात असलेल्या लोकांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सिडकोचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार आहे. सिलेक्ट माय सिडको होम ही तुमचं स्वतःचं घर निवडण्याची योजना आहे. सिडकोचे नवीन घर रेल्वे स्थानकाशेजारी असणार आहेत. सिडकोच्या या नव्या योजनेत ऑनलाइन लिंकवर जाऊन जागा निवडून घर खरेदी करता येणार आहे. नवी मुंबईत तुमच्या पसंतीच्या ठिकाणी घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी सिडको तुम्हाला सादर करणार आहे. केवळ स्थानच नाही तर आपल्या आवडीच्या मजल्यावर घर निवडण्याचा पर्याय देखील आहे.  सिडकोची लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी  सिडको लवकरच 5 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमध्ये घरे सोडतीसाठी तयार आहेत. म्हाडातील अनिल डिग्गीकर हे सिडकोच्य

नेबापुर मध्ये तुटलेल्या तारेचा करंट बसल्यामुळे माय लेकरांचा दुर्दैवी अंत!

Image
 नेबापुर मध्ये तुटलेल्या तारेचा करंट बसल्यामुळे माय लेकरांचा दुर्दैवी अंत! आज सकाळी सातच्या सुमारास पेरणीसाठी जमदारकी नावाच्या शेतामध्ये गेले होते त्या शेतात महावितरण ची दोन खांबाला जोडलेली विद्युत प्रवाह तार तुटलेली होती या तारेला अजयचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसला हा प्रकार पाहून आई नंदा मगदूम या आजयला सोडवण्यासाठी गेली असता त्यांना देखील विजेचा झटका बसला दोघांनाही कसलीही मदत न मिळाल्याने या माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला एकाच वेळी माय लेकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नेबापूर सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस पाटील रघुनाथ भोसले माजी सरपंच शिवाजी मोरे अभय पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचे पचनामे करून नातेवाईकांना ताब्यात दिले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केले होते दरम्यान घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांमधून महावितरणच्या या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे या तुटलेल्या तारे बदल महावितरणचे कर्मचारी गाफील कसे राहिले हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

धर्म निरपेक्ष देश असाच अखंड राहो - प्रा. आनंद साठे सर.

Image
 धर्म निरपेक्ष देश असाच अखंड राहो - प्रा. आनंद साठे सर. भारत हि एक संताची भूमि आहे या देशात सर्व जातीचे लोक गुणा गोविंदाने राहतात . काही किरकोळ जाती भेद असले तरी बंधूभावाने एकमेकांसाठी आप - आपसात मिटवून घेतात . सर्व सण साजरे करण्याचे हि एक परंपरा आहे . त्याच निमित्त साधून मी लेख लिहित आहे.सपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरचा - विठू - पाडूरंग - रुखमाई .महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी . या उत्सवा निमित्त दरवर्षी वारकरी आषाढी एकदशी निमित्ताने एकत्र येतात पण ह्या वर्षी योगा योग्य म्हणावा.मुस्लिम समाजाचा मोठा उत्सव म्हणजे बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवसी आले त्या निमिताने ऐक्याचे क्षण अनुभवायाला मिळाले .मांसाहार अन पशुहत्येचा गाजावाजा केला तर त्यांनी कुणीही न सागता बळी न देण्याचा फतवा काढला आणि सातारा जिल्ह्यांत सर्व मुस्लिम जमातानी आणि सघटनानी कुर्बान न करण्याचा विचार करून तसे ज्या त्या पोलिस ठाण्याला तसे निवेदन दिले ईद नतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बान करण्याचा बेत आखला आणि हिन्दू धर्माच्या आषाढी एकादशी चा आदर राखला व हिन्दूच्या भावनेचा आदर

विठ्ठलवाडी देवस्थान भक्तांच्या गर्दीने फुलले.

Image
 विठ्ठलवाडी देवस्थान भक्तांच्या गर्दीने फुलले. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र. पुणे   प्रतिनिधी  ------------------------------------ पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गापासून जवळच इंदापूर तालुक्यातील पाच गावांच्या सीमेवर असलेले, पंढरपूरप्रमाणेच श्री विठ्ठल- रुक्मिणी या देवतांची मूर्ती स्वयंभू असलेले कळस सई येथील क्षेत्र विठ्ठलवाडी देवस्थान हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. भोवताली रमणीय वातावरण तसेच वन विभागाचे क्षेत्र असल्याने, वन्य प्राणी व पशुपक्षी या भागात वावरताना दिसतात.उजनी जलाशयाजवळ असल्याने पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत आहे. महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला नेहमीच गर्दी झालेली दिसते, अखंड अन्नदान व धार्मिक उपक्रम गेल्या ४१ वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहेत. हा परिसर उजनी धरणाच्या जवळ असल्याने शांत व रम्य ठिकाण असल्याने, वन्य प्राणी हरणे, ससे तसेच मोर व इतर पशुपक्षी या भागात वावरताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाला परंपरा आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याठिकाणी राहण्यासाठी खोल्या  बांधुन सोय करण्यात आ

सिध्दनेर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

Image
 सिध्दनेर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.         ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र. सिध्दनेर्ली   प्रतिनिधी   ----------------------------------         सिध्दनेर्ली ता.कागल येथे व्हीजन स्प्रिंग दिल्ली, अनंतशांती सेवाभावी संस्था,समाज विकास केंद्र सिध्दनेर्ली व निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमात १२५ जणांनी नोंदणी करत उस्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये १२५ जणांची मोफत नेत्र तपासणी झाली.या शिबिराची सुरूवात सिध्दनेर्ली येथील डॉक्टर असोशिएशनच्या वतीने दिप प्रज्वलनाने झाली.   यावेळी प्रास्ताविक निसर्ग पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मा.मधुकर येवलुजे यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष समाज विकास केंद्राचे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम होते. डॉक्टर असोशिएशनच्या वतीने डॉ.सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरासाठी श्री. आण्णासाहेब पाटील (तारदाळे),संजय येवलुजे, लक्ष्मण गुरव,शंकर चंदर पाटील, दिपक माने,सौरभ माने,पवन पोवार यांच्या हस्ते चष्मे वाटप झाले तर सौरभ माने यांनी उपस्थितांचे आभार मा

भणंग मध्ये आषाढी एकादशी साजरी.

Image
 भणंग मध्ये आषाढी एकादशी साजरी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पाडूरंग , आषाढी एकादशीच्या निमित्ताने. हनुमान उदय मंडळाच्या सहभागातून व भणंग ग्रामस्थाच्या सहकार्‍याने आणि ज्ञानेश्वर भजन मंडळ याच्या मदतीने पाहटे ४:०० वाजल्यापासून विठ्ठल - रुक्मिणी यांचे  स्नान व अभिषेक करूण पुज्या आरती करुण विठ्ठलाची महापुज्या करण्यात आली . दिवसभर भजणी मंडळानी विविध प्रकारचे अभंग वाणीतून भजन गायले . दर्शण घेणाऱ्या भक्तांन साठी फराळ वाटप करण्यात आले . विठ्ठल भकाकडून फराळ वाटप करण्यात आला. केसकरवाडी , कुभारगणी विठ्ठल भक्तानी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला

वॉट्सअप कॉलिंग बनले प्रशासकीय लोकांचे नेटवर्क करण्याचे साधन.

Image
वॉट्सअप कॉलिंग बनले प्रशासकीय लोकांचे नेटवर्क करण्याचे साधन. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र. जयशिंगपूर प्रतिनिधी  राहुल कांबळे ---------------------------- आज जगभरात मोबाईल फोन चा वापर जवळपास सगळ्यच ठिकाणी केला आज जीवनात मोबाईल ही माणसाची मूलभूत गरज बनली आहे मोबाईल शिवाय पप्रत्येक व्यक्ती अपुरी आहे. त्यात मोबाईल ने आपल्या विश्वात इतकी प्रगती केली आहे कि प्रत्येकाचे सत्तर टक्के काम हे मोबाईल वर होते याकरिता केत्येक लेखकांनी मोबाईल श्राप कि वरदान यावर लेख लिहायचे काय कमी होत नाही.वॉट्सअप हे मोबाईल वरील इतके महत्वपूर्ण अप्लिकेशन बनले आहे कि आज प्रत्येकाचा वॉट्सअप बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही जेवढा नफा या मोबाईल वरील वॉट्सअप चा आहे तेवढच सोपं या काळे काम करणाऱ्यांसाठी मग ते काळे काम करणारे प्रशासकीय अधिकारी असो किव्हा कोणी राजकीय किव्हा इतर कोणी सामान्य व्यक्ती वॉट्सअप कॉलिंग चा पुरेपूर फायदा कोणाला होत असेल तर या लोकांना. एखादी गावगुंडाला खंडणी मागायची असेल तर वॉट्सअप कॉलिंग एखाद्या प्रशासकीय व्यक्तीला लाच मागायची असेल तर वॉट्सअप कॉलिंग आणि एखाद्या राजकी

गवा रेड्याने मारल्याने एक जन गंभीर जखमी दाजीपूर अभयारण्यात घटना घडली.

Image
 गवा रेड्याने मारल्याने  एक जन गंभीर जखमी दाजीपूर अभयारण्यात घटना घडली. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर पैकी वलवन येथील, विजय अर्जुन पाटील यांना ग वा रेड्याने मारल्याने गंभीर जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की दाजी पूर पैकी वळवण येथील विजय अर्जुन पाटील हे आपल्या शेळ्या  घेऊन, शेतामध्ये गेला असता अचानक आलेल्या गवा रेड्यांनी विजय अर्जुन पाटील या शेतकऱ्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत.या भागात वरच्यावर गवारेड्या मारल्याने शेतकरी वरचा जख मी होत आहेत या रेड्यांचा वन खात्याने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी भागातील शेतकरी करत आहेत.वलवन येथील गरीब शेतकरी विजय अर्जुना पाटील या शेतकऱ्यास वन खात्याने तातडीने मदत देऊन उपचार करावा अशी मागणी वलवन सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील संदीप पाटील यांनी केले आहे

औंध व कुडाळ मुस्लिम जमातीने हिंन्दू धर्माचा केला आदर.

Image
 औंध व कुडाळ मुस्लिम जमातीने हिंन्दू धर्माचा केला आदर. औंध येथील मुस्लीम जमातीने बकरी ईद दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे . ईदच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी केली जाईल असे औंध मुस्लिम कार्यकारणीचे अध्यक्ष हरुण शेख , उपध्यक्ष मुराद मुलाणी , खजिनदार समशेर खान , इलियाज पटवेकरी व इतर मुस्लिम जमात सदस्य यांनी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने हिन्दू समाजाच्या भावनांच्या आदर करत बकरी ईदला कुर्बानी नकता ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बान केली जाईल असे पत्र औधचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दराडे यांना पत्र दिले . तसेच.जावळी तालुक्यातील कुडाळ या ठिकाणीचे मुस्लिम समाजाने हि आपली बाधलकी जपत कुर्बान न करण्याचा निर्णय घेतला या वेळी जावळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वासीम शेख , व कुडाळ येथील मुस्लिम समाजा बांधव उपस्थित होते त्यांनी हा निर्णय घेवून सर्व समाजा समोर जावळी तालुक्या हिन्दू - मुस्लीम एकतेचा आर्दश घालून दिला.कुर्बान नकरण्याच्या निर्णयामुळे औंध व कुडाळ मधील हिन्दू समाज व मुस्लिम समाजाचे ऐकीचे बळ निर्माण झाल्याचे दिसून येते . हिन्दू व मुस्तिम समाजाचे बंधुभ

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत केसपेपरला तांत्रिक अडचण सांगुन पैशाची मागणी, सिव्हिल सर्जन डॉ सोनवणे लक्ष घाला.

Image
 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत केसपेपरला  तांत्रिक अडचण सांगुन पैशाची मागणी, सिव्हिल सर्जन डॉ सोनवणे लक्ष घाला. सध्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना साहेब पाटील रुग्णालयात मोफत केसपेपर मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या रुग्णांना सवलतीस पात्र असूनही पैशाची मागणी केली जात आहे. ते न दिल्यास अनिश्चित काळासाठी थांबावे लागेल असे सांगितले जाते. त्यामुळे शासनाच्या सुविधेचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांना ही बाब माहिती नाही का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत तातडीने लक्ष घालून मार्ग काढणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारो रूग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णालयात आल्यावर त्यांना तातडीने केसपेपर उपलब्ध होणे आवश्यक आहे.,तरच वेळेत डॉक्टरांना दआखवणू, त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करणे व पुन्हा त्यांना दाखवून सल्ला व औषध घेणे आवश्यक असते. नाहीतर सायंकाळ किंवा दुसऱ्या दिवसांपर्यंत वाट पहावी लागते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांच्या कालावधीत केसपेपर संगणकीकरण करण्यात आ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मंगळवारी ४जुलै रोजी अठरा नागरी सुविधांसाठी बैठक.

Image
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मंगळवारी ४जुलै रोजी अठरा नागरी सुविधांसाठी बैठक. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आले असता प्रत्येक गावात शासकीय योजना अंतर्गत १८ नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांना निवेदन दिले होते . यांची दखल घेत त्यांनी अधिका-यांना सुचना दिल्या. दरम्यान मंगळवारी चार जुलै रोजी तापोळा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी महाबळेश्वर व जावली गटविकास अधिकारी यांना देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना उपस्थित राहण्यासाठी आदेश दिले आहेत. या नागरी सुविधा सोळशी विभाग ३२गावे, कोयना विभाग ४३ गावे,कांदाटी विभाग १६ गावे, बामणोली विभाग १४ गावे अशी मिळुन १०५ गावांचा समावेश आहे. १८‌सुविधा या कोयना पुनर्वसन मध्ये असणाऱ्या गावांना आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकारी यांना १०५  गावांना लाभ देण्यात यावा असा आदेश दिला.  पुलं आणि रस्ते यांचा आराखडा तयार करून कामे सुरू आहेत. या सार्वजनिक कामाबरोबरच गावातील अंतर्गत कामे पूर्ण झाली तर गावे सक्षम होतील, पिण्याचे पाणी सर्व गावांना उपलब्ध झाले  पाह

जिल्हा परिषद शाळा आंबेघर काढली दिंडी.

Image
 जिल्हा परिषद शाळा आंबेघर काढली दिंडी. आषाढी एकादिशी   निमित्त विविध पारंपारीक वेशात ' वारकरी व संताचा वेश धारण करूण जिल्हा परिषद शाळा आंबेघर तर्फ कुडाळ या शाळेतील विद्यार्थीनी तीर्थक्षेत्र  प्रति पंढरपूर करहर ता जावळी या क्षेत्रा पर्यत दिंडी सोहळा काढला .बुधवार दि .28/06/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथ. शाळा आंबेघर तर्फ कुडाळ शाळेची दिंडी श्री तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर करहर ता .जावली येथे आयोजित करण्यात आली . शाळेतील विदयार्थ्यांनी , आंबेघर गावातील भजनी मंडळ, माता पालकवर्ग,ग्रामस्थ मंडळ तसेच अंगणवाडी सेविका साळुंखे मॅडम  व मदतनीस दिघे मॅडम यां सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.   वादनाच्या तालावर  ठेका देत नाच च गात  उत्साही वातावरणात करहर पर्यत सहभाग घेतला . तेथील भाविकांनी दिंडीचे स्वागत केले.आंबेघर शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाबुराव बामणे,श्री.महेश पालकर, श्री. निखिल परकाळे यां शिक्षकांनी  दिंडीचे आयोजन केले . शाळेच्या दिंडीला ग्रामस्थ मंडळ करहर यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले .

सातारा पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम सेवानिवृत्त समारंभ ३०जुनला होणार.

Image
 सातारा पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम  सेवानिवृत्त समारं भ ३०जुनला होणार.   सातारा पंचायत समिती येथील सतत कार्यरत असणारे लोकाभिमुख सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत निकम हे एकोणचाळिस वर्षाच्या सेवेतून निवृत्त होत आहे. त्यानिमित्त आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता निकम साहेब म्हणाले की,मी १/१०/१९८४ रोजी ग्रामसेवक म्हणून नांदगाव तालुका सातारा येथे कामाला सुरुवात केली. ९ वर्षे सलगपणे ग्रामसेवक म्हणून काम केले. १९९४रोजी ग्रामविसतार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. कोरेगाव येथे बी डी ओ म्हणून शिरढोण,लासुरणे येथे काम केले.२००१ते२०१३ मेंढा येथे विस्तार अधिकारी म्हणून काम केले. पुन्हा २०१३ते२०२३ पर्यंत सातारा येथे विस्तार अधिकारी म्हणून काम केले व ६ सप्टेंबर २०२३पासुन सातारा पंचायत समिती मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम केले. काम करताना आदर्श ग्रामसेवक, आदर्श विस्तार अधिकारी,व आदर्श ग्राम विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सातारा यांनी कामाची पोहोच म्हणून गुणगौरव करून पदोन्नती दिली. काम करीत असताना नागरिकांच्या प्रश्नांवर

दुचाकी चोरटे शाहुपुरी सातारा पोलीसांच्या ताब्यात, गुन्ह्यांची कबुली.

Image
 दुचाकी चोरटे शाहुपुरी सातारा पोलीसांच्या ताब्यात, गुन्ह्यांची कबुली. गेल्या काही दिवसांपासून शाहुपुरी बरोबरच सातारा मध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे हद्दीत दिनांक १२जुन रोजी राजवाडामंड ई परिसरात दुचाकी चोरी झाली होती. पोलीसांनी  घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका संशयिताची माहिती मिळाली. तो संशयित सातारच्या नगरवाचनालय परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली. यावेळी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली देवून दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सचिन बबन भोसले,वय २३, राहणार मंगळवार पेठ सातारा व सचिन अरुण दिक्षित,वय २३‌राहणार बिरजाईवाडी तालुका कोरेगाव अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान १८ जुन रोजी शाहुपुरी पोलिस सातारा येथील चोरी झालेली दुचाकी वाई येथे एक संशयित व्यक्ती वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाई येथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी संशयिताकडुन दुचाकी जप्त केली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर मलकापूर जवळ अपघात.

Image
 रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर मलकापूर जवळ अपघात. --------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------- आज दुपारी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर नजीक मालवाहतूक ट्रक आणि कारचा अपघात झाला.  कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बांबवडे मलकापूर तसेच शाहूवाडी या ठिकाणी अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूने व्यापार पेठ या कारणांनी कायम वाहतुकीची कोंडी असते. आज दुपारी दीडच्या दरम्यान रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली असली तरी, वेग नियंत्रित असल्यामुळे अपघाताची भीषणता सौम्य होती. मात्र या अपघाताने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सदरच्या ठिकाणी शाहूवाडी पोलिसांनी येत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.

राजू शेट्टी यांनी स्टंटबाजी बंद करावी.

Image
 राजू शेट्टी यांनी स्टंटबाजी बंद करावी. ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र. जयशिंगपुर प्रतिनिधी ---------------------------------------- यड्रावकरांच्या संस्थेची मापे काढण्या अगोदर आपण सुरू केलेल्या संस्थांबद्दल आत्मचिंतन करा.डॉ. दशरथ काळे जयसिंगपूर;-राजू शेट्टी एखाद्या गोष्टीचा स्टंट करण्यात पारंगत आहेत, जिल्हा बँकेत जसा स्टंट केला तसे अनेक स्टंट येणाऱ्या वर्षभरात ते करत राहतील जनतेने त्यांना जिल्हा व तालुका पातळीवर नाकारले आहे, तरीही  मला सर्व पक्षाची ऑफर आहे असा विनोद माध्यमांसमोर ते करीत आहेत, स्टंटबाजी हे राजू शेट्टी यांचे जुने हत्यार आहे परंतु ते आता कालबाह्य झाल्याने त्यांनी ते बंद करावे व यड्रावकरांच्या संस्थांची मापे काढण्यापेक्षा स्वतः दहा संस्था कागदावर उभा करून त्यातील उभ्या असलेल्या संस्था कशा सुरू आहेत याचे आत्मचिंतन करावे असा सवाल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर दशरथ काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे, शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील एका सेवा संस्थेस जिल्हा बँक हमीपत्र देत नाही या विषयावरून शेट्टी यांनी मंगळवारी जिल्हा बँकेत जाऊन

दुचाकी चोरट्यावर बोरगावं पोलीस यांची कडक कारवाई .

Image
 दुचाकी चोरट्यावर बोरगावं पोलीस यांची कडक कारवाई . बोरगाव:- रोजी,12.25 वाजनेच्या सुमारास,बोरगावं पोलीस ठाणे हद्दीमध्ये,गुन्हेप्रकटिकरण शाखेचे  पोलीस अंमलदार हे नियमित पेट्रोलिंग ड्युटी करत असताना, मौजे नागठाणे ता. जी. सातारा. नागठाणे चौकजवळ,  बोरगाव पोलीस अभिलेखावर गुन्हे करणारा( पोलिसांना ठाऊक असणारा.)  गुन्हेगार नाव संभाजी बबन जाधव. राहणार अतीत, ता.जि.सातारा.हा स्वतः सुजुकी कम्पनी ची  लाल रंगाची स्कुटी घेऊन जात असताना पोलीस अंमलदार यांना आढळला. संशयित हालचालीमुळे त्याला पकडण्यात यश आले,असे पोलिसांनी खुलासा करत सांगितले.  मोटार सायकल क्रमांक MH11- CA-4825.  ही मोटार सायकल विसावा पार्क सातारा येथून  22/05/2023 रोजी सायंकाळी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.  सदर मोटर सायकल बाबत सातारा पोलीस स्टेशन येथे, गु. रजि नं. 416/2023. भा.द.वि.स. 379 प्रमाणे -22/05/2023  रोजी गुन्हा दाखल असल्याचे निस्पन्न झाले आहे.  त्यानंतर सदर आरोपीवर बोरगाव पोलीस ठाणे. गुन्हेगार रजिस्टर नंबर 277/2023. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे  कलम 124 प्रमाणे. गुन्हा दाखल करून कारवाई करणेत आली आहे.  सदरची कारवाई- माननीय

शाळा, महाविद्यालय च्या वेळेनुसार एस टी चे नियोजन करण्याची मागणी.

Image
 शाळा, महाविद्यालय च्या वेळेनुसार एस टी चे नियोजन करण्याची मागणी. परळी :परळी, ठोसेघर, पाटेघर, केळवली, सज्जनगड, तसेच आजू बाजूच्या वाढी वस्तीतील शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयाच्या वेळेनुसार या परिसरात एसटी चे नियोजन करावे या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सातारा विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांना देण्यात आले शाळा व महाविदयालयच्या वेळेनुसार एसटी चे नियोजन नसल्याने विध्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन नाहक त्रास होतो त्यामुळे शाळेच्या वेळेनुसार एसटी चे नियोजन करावे असे निवेदणात म्हटले आहे यावेळी महेश जाधव, समाधान शेळके, सुधीर जाधव उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परळी मध्ये 11 वी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न.

Image
 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परळी मध्ये 11 वी प्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न. परळी: -शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इ 11वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 11वी चे वर्ग दिनांक 28जुन पासून सुरू झाले. या विद्यार्थ्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करण्यासाठी परळी गावाचे प्रमुख सरपंच मा.बाळासाहेब जाधव पाटील, उपसरपंच मा.नंदकुमार धोत्रे,संस्थेचे विभागीय सदस्य मा.गजानन बोबडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद माजी विद्यार्थी संघ व उरमोडी  समन्वय युवा मंच यांनी दिलेल्या वह्या व गुलाबपुष्प देवून करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने झाला.त्यानंतर प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री बामणे सर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देवून करण्यात आले.त्यानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांनी कॉलेज विषयी माहिती दिली.त्यानतंर ज्युनियर कॉलेज चे प्राध्यापक श्री अरविंद होगाडे सर यांनी कॉलेजच्या उपक्रमाविषयी माहिती दिली मान्यवरांनी 11 वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन

बिंदू चौक परिसरातील वीस पाणी मीटर चोरीला ! चोरीची घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद.

Image
बिंदू चौक परिसरातील वीस पाणी मीटर चोरीला ! चोरीची घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद. ----------------------------------------------------------------------------- -----------------------------------------------------------------------------   कोल्हापूर (प्रतिनिधी अन्सार मुल्ला:-  काल रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे हद्दीतील आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौका जवळील आझाद गल्ली परिसरातील तब्बल वीस पाणी मीटर चोरट्यांनी चोरले.  सदरची धक्कादाय घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि पोलिसांची तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या आजाद गल्लीतील पाणी मीटर चोरी झाले आहेत. सदरच्या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार येथील नागरिकांची आधीच पाण्या वाचून भटकंती सुरू असताना, आता चोरट्यांनी पाणी मीटरवर डल्ला मारल्याने येथील नागरिकांची सकाळ अतिशय त्रासदायक ठरली. पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटना स्थळी आले. मात्र अशा भुरट्या चोरांनी पोलिसांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरी करून खुले आव्हानच दिले आहे. सदरच्या चोरांचा आ