वडुज येथील ग्रामसेवक संजय विलासराव सोनावले बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.

 वडुज येथील ग्रामसेवक संजय विलासराव सोनावले बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.

पंचायत समिती खटाव (वडुज) येथील कार्यालयातील विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले यास आज दिनांक २५ मे रोजी बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे ग्रामसेवक असून  संजय सोनावले हे तक्रारदार यास वारंवार वरिष्ठांना तुझा कसुर अहवाल पाठविन, तसेच  कार्यालयीन कामकाज करतांना क्षुल्लक कारणावरून चुका काढीन वारंवार त्रास देत होते. तक्रारदार यांना कारणे दाखवा नोटीस न काढणे बदल बारा हजार रुपये लाच मागितली होती. व सतत मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आज दिनांक २५ मे रोजी बारा हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.अचानक कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर कारवाई ही पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांच्या आदेशानुसार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील पोलिस नाईक प्रशांत नलावडे, पोलिस नाईक निलेश चव्हाण, पोलिस काॅ. तुषार भोसले,चालक पोलिस नाईक मारुती अडागळे यांच्या पथकाने केली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.