डॉक्टरांनी त्रास दिल्याने कोरेगाव येथील व्यवस्थापक शशिकांत बोताळजी यांच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल. .
डॉक्टरांनी त्रास दिल्याने कोरेगाव येथील व्यवस्थापक शशिकांत बोताळजी यांच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल.
-------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
कोरेगाव येथील सुप्रसिध्द कोरेगांव हॉस्पिटल मधील व्यवस्थापक शशिकांत चंद्रकांत बोताळजी, वय ३२, राहणार चिंतामणी नगर, कोरेगाव यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी १४ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोपकरत मारहाण , जातिवाचक शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल आज कोरेगाव येथील डॉ. सुहास बाळकृष्ण चव्हाण,वय ४०, राहणार , लक्ष्मी नगर, कोरेगाव , डॉ.गणेश हरिभाऊ होळ,वय,५०, राहणार सुलतान वाडी, कोरेगाव,व गोपाळ शिवाजी साळुंखे,वय५५, राहणार पंचायत समितीच्या बाजूला, कोरेगाव यांच्या वर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील कोरेगाव हॉसपीटलचा टॅक्स वाचविण्यासाठी या तिघांनी आपसात संगनमत करून बेहिशोबी आर्थिक व्यवहार माझ्या मुलाच्या श शिकांत यांच्या नांवे अफरातफर केल्याचा मुद्दाम आळ घेतला असल्याचे शशिकांत याचेवडील यांनी सांगितले.
माझ्या मुलाला मारहाण करून, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच माझ्या मालकीची जमीन जबरदस्तीने शेतजमीन नावांवर करून घेऊन शशिकांत याला वारंवार , तुला पैसे द्यायला जमत नसतील तर तुझा जगुन काय उपयोग, पैसे दयायचे नसतील तर मरून जा असे म्हणुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी माझी त्या तिघांविरुद्ध तक्रार आहे. दरम्यान काल शशिकांत बोताळजी याने विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री त्याचे निधन झाले. मात्र आज दिवसभर याप्रकरणी संबंधित डाक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मयत बोताळजी यांचें नातेवाईक, समाजबांधव, विविध संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्यात गर्दी करुन होते. अखेर रात्री बोताळजी याचा मुरुतदेह रुग्णवाहिकेतून पोलिस ठाण्यात दरवाज्याच्या समोर आणला मात्र अखेरीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, त्यांचे दप्तरी अमोलसपकाळ यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर रुग्णवाहिका अंत्यसंस्कारासाठी चिंतामणी नगर, कोरेगाव येथे नेण्यात आली. अधिक तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उप अधीक्षक मोहन शिंदे करीत आहे.
रस्ता कडेने चाललेल्या रोडरोलरला पाठीमागून आर्टिगा गाडीची धडक !दोन जण ठार चार जण जखमी !
Comments
Post a Comment