गोडोली जकात नाका येथील आयर्लंड कडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,? .

 गोडोली जकात नाका येथील आयर्लंड कडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,? .

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी 

किरण अडागळे .

--------------------------------------

काही वर्षांपूर्वी गोडोली जकात नाका येथील चौकात माजी नगरसेवक दत्ता बनकर यांच्या संकल्पनेतून आयर्लंड बनविला होता. पण या आयर्लंडला सध्या अवकळा आली आहे. मूख्य गोडोली जकात नाका चौकात यामुळे सौंदर्यात भर पडली होती. गेली कित्येक वर्षे याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याला बकाल स्वरूप आले आहे. हा आयर्लंड तातडीने पुन्हा उभारी घेणार का? सध्या या आयर्लंड बद्दल कोणासही देणे घेणे नाही. कारण शेजारी लागुन रिक्षा स्टॅण्ड आहे. कट्ट्यावर बसून नागरिक वेळ घालवतात. शिवाय एस.टि.थांबा येथे निर्माण केल्याने सदर आयर्लंड वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहेत. मुळात येथे प्रचंड प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे अपघात होऊ शकतो. एकतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती. करावी किंवा हा‌ आयर्लंड काढून रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.








Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.