सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दुसऱ्यांदा अँडव्होकेट विक्रम पवार यांना संधी,तर उप सभापती पदी मधुकर पवार.

सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दुसऱ्यांदा अँडव्होकेट विक्रम पवार यांना संधी,तर उप सभापती पदी मधुकर पवार.



नुकत्याच झालेल्या सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांच्या गटाने सर्वच सर्व जागा  १८ जिंकून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.गुरुवारी सभापती आणि उप सभापती पदासाठी निवडी झाल्या. यामध्ये पुन्हा एकदा  अँडव्होकेट विक्रम पवार यांना सभापती पदी संधी मिळाली व उप सभापती पदी मधुकर पवार यांना संधी देण्यात आली. सर्व संचालक यांच्या वतीने शंकर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.‌ यावेळी सर्व ‌संचालक तसेच अधिकारी व सचिव रघुनाथ मधले उपस्थित होते. यावेळी सभापती विक्रम पवार म्हणाले की, खिंड वाडी येथील १७ एकर जमिनीवर सुसज्ज अशी अद्ययावत मार्केट कमिटी लवकरच उभारावी म्हणून प्रयत्न करणार आहे. तसेच हमाल बांधवांसाठी हमाल भवन ‌बांधुन के. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानतो. उपसभापती मधुकर पवार म्हणाले की, निष्ठा ठेवली म्हणून मला निष्ठेचे फळ मिळाले.आगामी काळात सर्वांच्या विचाराने कार्यरत राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.