जयसिंगपूरात सकल वडार समाजाचा मुक मोर्चा.पिढीताला न्याय मिळावा ही सांघिक भावना.
जयसिंगपूरात सकल वडार समाजाचा मुक मोर्चा.पिढीताला न्याय मिळावा ही सांघिक भावना.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
जयसिंगपूर : प्रतिनिधी
नामदेव भोसले
----------------------------------
चिपरी (ता.शिरोळ) येथील अस्लम हुसेनसाब सवनुर (रा.बेघर वसाहत ) याने एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सोमवारी सर्वपक्षीय संघटनेने सकल वडार समाजाच्या समर्थनार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मूक मोर्चा काढला.मोठ्या संख्येने निघालेल्या मूक मोर्चात पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या मागणीबरोबर ,राजकीय उट्टे काढले जात आहेत की, काय ? असे प्रकर्षाने जाणवत होते. राजकीय मंडळींचे मोर्चाला समर्थन असले तरी प्रत्येकाने आपल्या भाषणातून मांडलेले मुद्दे निश्चितच एकमेकांचा चिमटा काढणारे होते. यात शंका नाही.मोर्चातल्या भाषणातून एकमेकांनी एकमेकाकडे राजकीय बोट केले. परंतु याचा पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या घटनेशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये,याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे.सकल वडार समाजातर्फे काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्याने पाठिंबा दर्शवत मोर्चा होईपर्यंत दुकाने बंद ठेवली होती. बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी सवनुर याचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. त्याला फाशीची शिक्षा द्यावी, गुन्ह्याचे कामकाज पाहण्यासाठी नामवंत सरकारी वकील द्यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी जय बजरंग,जय वडार समाज अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष नीता माने अशाताई गाडीवडर, संतोष जाधव, सचिन भोसले यांनी आपल्या भाषणातून तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी रेखा देशमुख, शैलेश एडके, अॅड. संभाजीराजे नाईक,सर्जेराव पवार, सावकर मादनाईक,महेश कलगुटगी, सुनील ताडे, अमोल पवार, बबलू नलवडे ,लक्ष्मण कलगुटगी यांच्यासह मोर्चेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा.मंत्री व आम.राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, पोलिसांनी संशयीत आरोपीवर कारवाई करून त्यास अटक केली आहे. महिलांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असून त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.घटनेबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे. खटल्याचा सहा महिन्याच्या आत निकाल लागून संशयीत्याला फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी गृहमंत्री व पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे, कोणी,जोरजोरात बोललं आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. एवढ्यावर आपलं काम संपलं नाही असे बोलून त्यांनी, ज्या व्यक्तीला झटका द्यायचा आहे त्या व्यक्तीला झटका दिला. आणि पीडित महिलेचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वीकारली.यावेळी मा.मंत्री यांचा रोख जरा वेगळाच दिसत होता. संतोष जाधव म्हणाले, काही राजकीय लोकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, जी गोष्ट सुरुवातीपासून होणे आवश्यक होती. त्याला फार वेळ झाला.याद राखा, जयसिंगपूरात 15 हजार वडार समाज आहे. जर पाठिंबा हवा असेल तर त्यांच्याशी प्रामाणिकच वागावे लागेल.असा इशारा दिला. एकूणच वडार समाजाने काढलेला मोर्चा एका पिढीत महिलेला न्याय मिळावा म्हणून होता याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी एवढेच.
Comments
Post a Comment