Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती मंजूर.नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे जाहीर आभार.

 अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती मंजूर.नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे जाहीर आभार.


----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रवि पी ढवळे

नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी 

----------------------------

नवी मुंबई :-बहुजन प्रेरणा सामाजिक संस्था आणि विविध पक्ष पदाधीकारी व सामाजिक संघटनेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना जाहीर निवेदन देण्यात आले. 

नेरूळ येथील ज्वेल ऑफ पार्क येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा करा, नवी मुंबईत प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छञपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळ उभा करणे, बेलापूर येथे (ऐरोली) प्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण करणे, सारसोळे बसडेपो चौक येथे अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती देखावा करणे, अशा प्रकारे विविध मागण्यांचे निवेदन दिले असता, प्रतिक्रिया देताना आयुक्त म्हणाले "पुतळा उभा करण्याची प्रोसेस चालु आहे. त्याला वेळ लागेल पण नेरूळ ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभा करण्या संदर्भात तशा हालचाली चालु आहेत. आपल्या या विविध मागण्यातील एक मागणी अताच मंजूर करतो ते म्हणजे सारसोळे बस डेपो चौक, सेक्टर 8 येथील बिकानेर काॅरनर येथे अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती देखावा लवकरच करण्यात येईल..! ऐरीया मॅनेजर कडे तसा प्रस्ताव पाठवुन दिला आहे व पुढील पाहणी होताच त्याची शहानिशा करून लवकरच त्या चौकात संविधान शिल्पकृती देखावा करण्यात येईल, ऊपोषण वैगरे करण्याची काहीच गरज नाही आपल्या सर्वमागण्या विचाराधीन आहेत." 

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडे, माजी सैनिक संजय काकडे, कवी दाजी बिडकर, विजय चौधरी, बसपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश जैस्वार, (बसपा) संजय गायकवाड, पंचशील सामाजिक संस्था संघटक कोंडीबा हिंगोले, रिपब्लिकन सेना महिला जिल्हा कार्याध्यक्ष दिपा बम, रिपब्लिकन सेना महिला सचिव शोभाताई इंगळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना अमन बम, रिपब्लिकन सेना बेलापूर अध्यक्ष सुमित तांबे, अँड धनश्री बणसोडे, भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका शोभाताई कांबळे, बौद्धाचार्य कल्याणराव हनवते, युवा कार्यकर्ते रोहीत कांबळे, हर्षद पाठक, सुमेध हनवते, आरपीआय (आ) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे तसेच नेरूळ जयंती उत्सव समीती व भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य यांनी जाहीर पाठींबा दिल्याने वरील मागण्यांना एक प्रकारचे बळ मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments