जयसिंगपूर येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार.
जयसिंगपूर येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार.
---------------------------------
जयसिंगपूर/प्रतिनिधी
नामदेव भोसले.
---------------------------------
शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे असलम हुसेनसाब सवनुर राहणार चिपरी या नराधमाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केलेला आहे सदर घटनेची कठोर चौकशी करून कठोर शासन व्हावे व जयसिंगपूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढता महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी व अशा मोकाट नराधमांना तात्काळ गजाआड करावे व कठोर कारवाई करण्यात यावी या घटनेतील आरोपी वरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे अशा सराईत गुन्हेगाराला गाव गुंडाला पोलीस प्रशासनाने पाठीशी घालू नये व कोणत्या ही राजकीय दबावाला बळी न पडता या मागासवर्गीय असणाऱ्या महिलेला भारत मातेच्या कन्येला भारतीय नारीला न्याय देण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचलून कठोर शासन करावे अशी मागणी वडार समाजाच्या वतीने करण्यात येत आहे
Comments
Post a Comment