करंजफेण (ता. पन्हाळा )येथील चंद्रकांत नाथा पाटील यांचा 'नंदया ' नावाचा बैलाचं पाटील घराण्याशी अनोख नातं आहे, या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे (सावकार )यांनी भेट दिली.
करंजफेण (ता. पन्हाळा )येथील चंद्रकांत नाथा पाटील यांचा 'नंदया ' नावाचा बैलाचं पाटील घराण्याशी अनोख नातं आहे, या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे (सावकार )यांनी भेट दिली.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
------------------------------
करंजफेन (ता.पन्हाळा ) येथील श्री.चंद्रकात नाथा पाटील यांचा 'नंदया' नावांचा बैल कोल्हापूर,सांगली,सातारा आणि पुणे जिल्हातील बैलगाडा शर्यतीत गाजलेला बैल आहे. पाटील कुटुंबियांनी नंदया ह्या बैलाला घरच्या सदस्याप्रमाने सांभाळले आहे *श्री.चंद्रकात नाथा पाटील यांचा पुतण्या कु.ओम अमित पाटील ह्यांचं या नंदया बैलांवर जीवापाड प्रेम त्यामुळे कु.ओम बैलांच्या मानेखालून हात कुरवाळतो, बैलांच्या पायात बसतो तसेच बैलांच्या पाठीवर बसतो. कु.ओम आणि नंदया बैलांचे एक आगळं वेगळं नांत तयार झालं असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि कु.ओमच्या नंदया बैलाबरोबर असलेल्या नात्याचे विशेष कौतुक केले यावेळी रामचंद्र पाटील,लक्ष्मण पाटील,एकनाथ पाटील,रंगराव पाटील,हरी पाटील,बाजीराव पाटील,आनंदा आरंडे,प्रकाश पाटील,अंकुश पाटील,सागर पाटील,मारुती पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment