महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट.
महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
किरण अडागळे
-------------------------------------
सोमवारी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी महाबळेश्वर येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील जनरल वार्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, रक्तपेढी, सिटी स्कॅन, एक्सरे या विभागाची पाहणी करून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारि यांना महात्मा फुले आरोग्य योजना त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी संचालक फादर टाॅमी करिअलकुलम यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारि, पोलिस अधीक्षक समीर शेख, व्यवस्थापक जितीन जोश, डॉ, सुनील पिसे, डॉ.सिजो जान, डॉ.मंगला अहिवळे, डॉ, नरेंद्र तावडे, डॉ.रेशमा नदाफ, डॉ.शयाल पावसकर यांच्या सह रुग्णालयातील सेवक उपस्थित होते. यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यपाल रमेश बैस यांनी गारमीण भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment