जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे वर्चस्व.
जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे वर्चस्व.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
भंणग प्रतिनिधी
शेखर जाधव
-----------------------------------
सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकारी साहाय्यक संस्थेच्या निवडणुकीत वरदविनायक पॅनल ने वर्चस्व मिळवले आहे पॅनल ने सर्व 15 जागा जिंकूत सत्ताधारी काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक पॅनलचा सुपडासाफ केला अष्टविनायक , पॅनलला आपले खाते खोलता आले नाही.
वरद विनायक विरुद्ध अष्टविनायक अशी तुरंगी लढत पाहायला मिळाली दोन्ही पॅनल साठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती .दोन्ही पॅनल प्रमुख उमेदवारांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती येथे जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेन्यात आल्याया. निवडणुकीत 626 मतदान होते त्या पैकी 588 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वरद विनायक पॅनल मधून , पंचायत समिती मेढा वरिष्ठ सहाय्यक मधून जाधव राकेश धनाजी यांनी निवडणूक लढवून 283 मते मिळवून निवडून आले , राकेश जाधव यांच्यावर मेढा पंचायत समिती तसेच ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.वरद विनायक पॅनलचे नेतृत्व संस्थेची माजी अध्यक्ष सागर साळुंखे अमोल पवार दिनकर चव्हाण सुनील खामकर तसेच मारुती जाधव यांनी केले , यांना आपले सर्व 15 उमेदवार निवडून आणण्यात यश आले , निकाल लागल्यानंतर परत विनायक पॅनलचे सर्व उमेदवार यांनी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार , अर्पण केल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला , संस्थेच्या सर्व नूतन संचालकांचे विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment