Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

यशवंत सावंत यांचा प्रामाणिकपणा! परंतु पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस पदक विजेत्या पोलिसाचा अपमान !



 यशवंत सावंत यांचा प्रामाणिकपणा! परंतु पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस पदक विजेत्या पोलिसाचा अपमान !



महाराष्ट्र पोलिस पदकाचे मानकरी मा श्री दिलीप महादेव जाधव हे मेढा पोलिस ठाण्यात पाकिट हारविल्या बाबत तक्रार देण्यास मेढा पोलिस ठाण्यात गेले असता अर्ज लिहिण्यासाठी तेथील पोलिस अंमलदार व इतर सेवकांच्या कडे पेन ची मागणी केली असता त्यांना सहकार्य केले गेले नाही ह्या बाबत सेवा निवृत्त पोलिस दिलीप जाधव मेढा पोलिस ठाण्यावर नाराज झाले . ते या वेळी म्हणाले कि मी पोलिस दलात ३४ वर्षे सेवा केली माझ्या सारख्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मेढा पोलिस ठाण्यात व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर सर्व सामान्य नागरिकांना काय सेवा मिळणार अशी खंत सेवा निवृत पोलिस दिलीप जाधव यांनी मांडली 
श्री दिलीप जाधव हे मुळचे भणंग गावचे रहिवासी आसून ते मेढा येथे बाजार व काही कामा निमित्त गेले असता मेढा चादणी चौकात त्यांचे पैसाचे पाकीट हरविले हे त्यांच्या लक्षात आले असता ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता वरील प्रकारचा अनुभव मेढा पोलिस ठाण्यात आला .
त्या नंतर त्यांना चिंचणी चे सुपुत्र यशवंत सावंत याचा फोन आला व त्यांनी तुमचे पाकिट मला साप डले आहे. असा निरोप दिला . पंचायत सामती मध्ये येवून घेऊन जावा असे सागितले. सावंत हे जावळी तालुक्यात आरोग्य खात्यात सेवा कार्यरत आहेत
दिलीप जाधव यांनी पंचायत समिती मध्ये बि. टी . ओ साहेब यांच्या उपस्थित यशवंत सावंत याच्या प्रामाणिकपणा बदल त्यांचा शाळ व श्रीफळ देऊन स्वागत केले .
ह्या त्याचा प्रामाणिक पणा बदल सर्व जावळी तालुक्यात व आरोग्य खातात त्यांचें कौतूक होत आहे.

Post a Comment

0 Comments