सातारा तालुक्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली प्रसुती असलेल्या महिलेस प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात परळी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देणार :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के.
सातारा तालुक्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली प्रसुती असलेल्या महिलेस प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात परळी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देणार :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के.
-----------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
परळी :सध्या सातारा तालुका येथील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम प्रसुती असलेल्या महिलेस प्रसूतीची सुविधा नाही त्या महिलेस चिट्ठी देऊन सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पाठविले जाते त्यामुळे रुग्णांच्या जीवास धोका पत्करावा लागतो त्यासाठी प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात सुविधा सदर आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहे सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गाव वाड्यातील व ईतर गावातील महिला व नारगरिक प्रथमोपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांना प्रसुती पुर्व व प्रसुती विषयक सुविधा उपलब्ध नाहीत. जर एखादी महिला प्रथम प्रसुती साठी दाखल झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सल्ला दिला जातो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरपूर जागा उपलब्ध आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसुती पुर्व सुविधा व प्रसुती पश्चात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. मुळात या केंद्रात आरोग्य सेवेत फारसे लक्ष देत नाही. असे दिसून येते याबाबत आमचे परळी येथील प्रतिनिधी नितीन कुंभार यांनी सदर बाब आमचे फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांच्या निदर्शनास आणून दिली असता तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांचेशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी आश्वासन दिले की, मी ताबडतोब माहीती घेऊन प्रसुती पुर्व व प्रसुती पश्चात सेवा देण्याचे आश्वासन देतो असे सांगितले याबद्दल फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र यांनी डॉ. प्रमोद शिर्के यांचे आभार मानले व सदरबाबत पाठपुरावा केला म्हणून परिसरातील नागरिक व महिला यांनी फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे आभार मानले
Comments
Post a Comment