ब़ांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोन महिलांसह रिक्षा चालक अटक, शाहुपुरी सातारा पोलीसांची कारवाई.
ब़ांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोन महिलांसह रिक्षा चालक अटक, शाहुपुरी सातारा पोलीसांची कारवाई.
सातारा. मंगळवार पेठ, सातारा येथील बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीला १लाख३५ हजार रुपये मुद्देमालासह शाहुपुरी सातारा पोलीसांची अटक केली. बजरंग यशवंत काळे, वय ३३, राहणार मोळाचा ओढा सातारा,हा रिक्षा चालक आहे.सोमावती विजय घाडगे,वय,३०,पुनम मुकेश जाधव,वय २५, राहणार दोघी गोसावी वस्ती, सैदापुर तालुका सातारा अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ढोणे काॅलनी, सातारा येथे नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणाहून दोन महिलांनी लोखंडी साहित्याची चोरी केल्याबद्दल विजय रमेश देशमुख, राहणार चिमणपुरा पेठ, सातारा यांनी फिर्याद दिली होती. शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शाहुपुरी पोलिस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमुळे धागेदोरे मिळाले. मात्र काही ठोस माहिती मिळत नव्हती. शाहुपुरी सातारा पोलीस पहाटे गस्त घालत असताना एका रिक्षात दोन महिला संशयित रित्या फिरताना आढळून आल्या. दरम्यान शाहुपुरी पोलिस ठाण्याचे हवालदार डमकले रात्रपाळीत असता या दोन महिला पकडून शाहुपुरी पोलिस ठाण्यात आणल्या व पोलिस चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीचा मार वरिक्षा जप्त करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार हसन तडवी,लैलैश फडतरे, तुषार डमकले, अमित माने, स्वप्नील कुंभार , ओंकार यादव, सचिन पवार, शशिकांत नलवडे यांनी भाग घेतला. अधिक तपास हवालदार हसन तडवी करीत आहेत.
Comments
Post a Comment