बारावीचा निकाल जाहीर: फलटण तालुक्याचा निकाल 90.23 टक्के.
बारावीचा निकाल जाहीर: फलटण तालुक्याचा निकाल 90.23 टक्के.
------------------------------
फलटण प्रतिनिधी
------------------------------
फलटण.;-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालात ही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के लागला असून फलटण तालुक्याचा निकाल ९०.२३ टक्के लागला आहे. तालुक्यातून ३३०७ विद्यार्थी बारावी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २९८४ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामुळे डिस्टिंक्शनमध्ये १०८ विद्यार्थी, फर्स्ट क्लासमध्ये ६१८ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये १५५४तर सर्वसाधारण श्रेणीत ७०४ विद्यार्थी पास झाले आहेत.
फलटण तालुक्यातून अॖमबिशन इंग्लिश मिडियम स्कूल आणि जी ज्युनि.कॉलेज, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनि. कॉलेज कोळकी, श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज जाधववाडी हाजी अब्दुल रज्जाक उर्दू स्कूल आणि ज्युनियर कॉलेज फलटण या विद्यालयाचा निकाल १००टक्के लागला आहे.
Comments
Post a Comment