Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी.

120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी.

----------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------

  कोल्हापूर:-महाराष्ट्र राज्य माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संगटनेच्या वतीने आज कोल्हापूर येथे तब्बल 120 हुन अधिक माजी पोलीस यांची 75 पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

कोल्हापूर;-पोलीस म्हणजे पोट सुटलेला आणि आणि आरोग्यासाठी कसलीही काळजी न घेतलेलं अस चित्र सर्वसामान्य मध्ये असताना, कोल्हापूर मधील तब्बल120 पोलीस कर्मचारी यांचा वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलंय. आशा सर्व माजी पोलीसांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अलंकार हॉल मध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी भगवानराव मोरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक देसाई तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

सुरुवातीला पोलीस परेड ग्राउंड वर वयाची 75 पूर्ण केलेल्या सर्व माजी पोलिसांच्या वर फुलांचा वर्षाव करीत अलंकार हॉल येथे आणण्यात आले. त्यानंतर शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भरजरी फेटे बांधून माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्काराने माजी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र होतं. माजी पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिशय अनोख्या आणि भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पोलिसांचे विविध प्रश्न तसेच संघटनेच्या वतीने राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती माजी पोलीस अधिकारी पंढरीनाथ मांढरे यांच्या वतीने देण्यात आले. सर्व आजी-माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या अनोख्या कार्यक्रमात एका कुटुंबाप्रमाणे रंगून गेले होते.

Post a Comment

0 Comments