Posts

Showing posts from May, 2023

120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी.

Image
120 हून अधिक माजी पोलीस यांची 75 री मोठ्या उत्साहात साजरी. ---------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------    कोल्हापूर :-महाराष्ट्र राज्य माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संगटनेच्या वतीने आज कोल्हापूर येथे तब्बल 120 हुन अधिक माजी पोलीस यांची 75 पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  कोल्हापूर;- पोलीस म्हणजे पोट सुटलेला आणि आणि आरोग्यासाठी कसलीही काळजी न घेतलेलं अस चित्र सर्वसामान्य मध्ये असताना, कोल्हापूर मधील तब्बल120 पोलीस कर्मचारी यांचा वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलंय. आशा सर्व माजी पोलीसांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अलंकार हॉल मध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी भगवानराव मोरे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक देसाई तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.  सुरुवातीला पोलीस प

जयसिंगपूरात सकल वडार समाजाचा मुक मोर्चा.पिढीताला न्याय मिळावा ही सांघिक भावना.

Image
 जयसिंगपूरात सकल वडार समाजाचा मुक मोर्चा.पिढीताला न्याय मिळावा ही सांघिक भावना. ---------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र जयसिंगपूर : प्रतिनिधी  नामदेव भोसले ---------------------------------- चिपरी (ता.शिरोळ) येथील अस्लम हुसेनसाब सवनुर (रा.बेघर वसाहत ) याने एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सोमवारी सर्वपक्षीय संघटनेने सकल वडार समाजाच्या समर्थनार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मूक मोर्चा काढला.मोठ्या संख्येने निघालेल्या मूक मोर्चात पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या मागणीबरोबर ,राजकीय उट्टे काढले जात आहेत की, काय ? असे प्रकर्षाने जाणवत होते. राजकीय मंडळींचे मोर्चाला समर्थन असले तरी प्रत्येकाने आपल्या भाषणातून मांडलेले मुद्दे निश्चितच एकमेकांचा चिमटा काढणारे होते. यात शंका नाही.मोर्चातल्या भाषणातून एकमेकांनी एकमेकाकडे राजकीय बोट केले. परंतु याचा पीडित महिलेला न्याय मिळण्याच्या घटनेशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये,याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे.सकल वडार समाजातर्फे काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्याने पाठिंबा दर्शवत म

करंजफेण (ता. पन्हाळा )येथील चंद्रकांत नाथा पाटील यांचा 'नंदया ' नावाचा बैलाचं पाटील घराण्याशी अनोख नातं आहे, या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे (सावकार )यांनी भेट दिली.

Image
करंजफेण (ता. पन्हाळा )येथील चंद्रकांत नाथा पाटील यांचा 'नंदया ' नावाचा बैलाचं पाटील घराण्याशी अनोख नातं आहे, या ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे (सावकार )यांनी भेट दिली. ---------------------------------   फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील ------------------------------   करंजफेन (ता.पन्हाळा ) येथील श्री.चंद्रकात नाथा पाटील यांचा 'नंदया' नावांचा बैल कोल्हापूर,सांगली,सातारा आणि पुणे जिल्हातील बैलगाडा शर्यतीत गाजलेला बैल आहे. पाटील कुटुंबियांनी नंदया ह्या बैलाला घरच्या सदस्याप्रमाने सांभाळले आहे *श्री.चंद्रकात नाथा पाटील यांचा पुतण्या कु.ओम अमित पाटील ह्यांचं या नंदया बैलांवर जीवापाड प्रेम त्यामुळे कु.ओम बैलांच्या मानेखालून हात कुरवाळतो, बैलांच्या पायात बसतो तसेच बैलांच्या पाठीवर बसतो. कु.ओम आणि नंदया बैलांचे एक आगळं वेगळं नांत तयार झालं असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि कु.ओमच्या नंदया बैलाबरोबर असलेल्या नात्याचे विशेष कौतुक केले यावेळी रामचंद्र पाटील,लक्ष्मण पाटील,एकनाथ पाटील,रंगराव पाटील,हरी पाटील,बाजीराव पाटील,आनंदा आरंडे,प्रक

स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 5 लाखांचा निधी प्राप्त.

Image
 स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 2 कोटी 5 लाखांचा निधी प्राप्त. ------------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र. अमरावती प्रतिनिधी.  गजानन जिरापुरे ------------------------------------- अमरावती,: अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व अन्य आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांना 13 जून 2018 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. सन 2020-21 व 2021-22 मधील  एकूण 703 विद्यार्थ्यांना शासनाकडून 2 कोटी 4 लक्ष 91 हजार रुपयांचा निधी मिळाला असून यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना इयत्ता 11

सातारा तालुक्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली प्रसुती असलेल्या महिलेस प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात परळी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देणार :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के.

Image
 सातारा तालुक्यातील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली प्रसुती असलेल्या महिलेस प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात परळी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देणार :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के. ----------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------ परळी :सध्या सातारा तालुका  येथील परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम प्रसुती असलेल्या महिलेस प्रसूतीची सुविधा नाही त्या महिलेस चिट्ठी देऊन सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पाठविले जाते त्यामुळे रुग्णांच्या जीवास धोका पत्करावा लागतो त्यासाठी प्रसुती पुर्व व प्रसूती पश्चात सुविधा सदर आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहे सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गाव वाड्यातील व ईतर गावातील महिला व नारगरिक प्रथमोपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांना प्रसुती पुर्व व प्रसुती विषयक सुविधा उपलब्ध नाहीत. जर एखादी महिला प्रथम प्रसुती साठी दाखल झाल्यानंतर ‌ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सल्ला दिला जातो.

जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे वर्चस्व.

Image
 जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे वर्चस्व. ----------------- ------------------ फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  भंणग प्रतिनिधी  शेखर जाधव ----------------------------------- सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकारी साहाय्यक संस्थेच्या निवडणुकीत वरदविनायक पॅनल ने वर्चस्व मिळवले आहे पॅनल ने सर्व 15 जागा जिंकूत सत्ताधारी काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक पॅनलचा सुपडासाफ केला अष्टविनायक , पॅनलला आपले खाते खोलता आले नाही. वरद विनायक विरुद्ध अष्टविनायक अशी तुरंगी लढत पाहायला मिळाली दोन्ही पॅनल साठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती .दोन्ही पॅनल प्रमुख उमेदवारांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती येथे जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेन्यात आल्याया. निवडणुकीत 626 मतदान होते त्या पैकी 588 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वरद विनायक पॅनल मधून , पंचायत समिती मेढा वरिष्ठ सहाय्यक मधून जाधव राकेश धनाजी यांनी निवडणूक लढवून 283 मते मिळवून निवडून आले , राकेश जाधव यांच्यावर मेढा पंचायत समिती तसेच ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.वरद विनायक पॅ

जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत महसूल प्रशासनाची गतिमान कार्यवाही.

Image
  जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत महसूल प्रशासनाची गतिमान कार्यवाही.  -------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र अमरावती प्रतिनिधी.  गजानन जिरापूरे ----------------------------- अमरावती, दि. 29 : चांदूर बाजार येथील महसूल पथकाने तालुक्यातील बेलुरा गढी येथे आज 42 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना ही वाळू तत्काळ वितरितही करण्यात आली. अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार विविध तालुक्यात महसूल पथकांकडून गतिमान कार्यवाही होत आहे. बेलुरा गढी येथे अवैध रेतीसाठा असल्याची माहिती मिळताच चांदूर बाजार तहसील पथकाने आज साडेदहाच्या सुमारास तिथे पोहोचून कारवाई केली. त्यात 42 ब्रास वाळू पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. जप्त केलेली वाळू चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पथकाने तुळजापूर गढी येथील ग्रामपंचायत सचिवांकडून घरकुल लाभार्थ्यांची यादी मिळवली. या यादीतील लाभार्थ्यांना उपलब्ध वाळूमधून त्या

पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी! पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी!

Image
 पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी! पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी! कोल्हापूर ;-पत्रकारांना धमकी आणि असभ्यवर्तन करणाऱ्या होणार पन्नास हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधानाने मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांच्यावर सुद्धा आता एफ आर आय नोंदविला जाणार. पत्रकारांशी आणि गैरवर्तन करणाऱ्या अधिकारी याची आता गय नाहीं हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांला 50 हजार रुपयांचा दंड आणि गैरवर्तन करणाऱ्यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागल अंशी घोषणा केली पत्रकारांना धमकी देणाऱ्यानां तुरुंगात पाठवले जाईल आणि त्यांना सहजासहजी जामीन मंजूर होणार नाही . पत्रकार हा जमावाचा भाग नाहीत ही बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय यांनी सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत पोलीस जशी गर्दी हटवतात तशी प

जागा उपलब्ध असतानाही अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत राजे समरजितसिंह घाटगे.

Image
  जागा उपलब्ध असतानाही   अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत राजे समरजितसिंह घाटगे. ------------------------------------------------ फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  मुरगुड प्रतिनिधी  जोतिराम कुंभार ------------------------------------------------   मुरगुड येथे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.  कागल विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी, आरोग्य, प्राथमिक शाळा हे समाजातील मूलभूत घटक अनेक  पायाभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. कागल सारख्या शहरात तर वैद्यकीय सुविधांसाठी मुबलक शासकीय जागा उपलब्ध असतानाही स्वतःला महाडॉक्टर म्हणून घेणाऱ्यांनी अद्ययावत वैद्यकीय सुविधा का उभारल्या नाहीत असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.     मुरगुड (ता.कागल) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कोटी ४०लाख रुपयांच्या  विकासकामांचा शुभारंभ तसेच संजय गांधी,इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेतील 155 पात्र लाभार्थ्यांच्या मंजुरी पत्रांच्या वितरण प्रसंगी आयोजित केलेल्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.      यावेळी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्व

गोडोली जकात नाका येथील आयर्लंड कडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,? .

Image
  गोडोली जकात नाका येथील आयर्लंड कडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष,? . -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा प्रतिनिधी  किरण अडागळे . -------------------------------------- काही वर्षांपूर्वी गोडोली जकात नाका येथील चौकात माजी नगरसेवक दत्ता बनकर यांच्या संकल्पनेतून आयर्लंड बनविला होता. पण या आयर्लंडला सध्या अवकळा आली आहे. मूख्य गोडोली जकात नाका चौकात यामुळे सौंदर्यात भर पडली होती. गेली कित्येक वर्षे याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याला बकाल स्वरूप आले आहे. हा आयर्लंड तातडीने पुन्हा उभारी घेणार का? सध्या या आयर्लंड बद्दल कोणासही देणे घेणे नाही. कारण शेजारी लागुन रिक्षा स्टॅण्ड आहे. कट्ट्यावर बसून नागरिक वेळ घालवतात. शिवाय एस.टि.थांबा येथे निर्माण केल्याने सदर आयर्लंड वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहेत. मुळात येथे प्रचंड प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे अपघात होऊ शकतो. एकतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती. करावी किंवा हा‌ आयर्लंड काढून रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

आरपीआय आठवले गटाकडून MSEB विरोधात आंदोलन.

Image
  आरपीआय आठवले गटाकडून MSEB विरोधात आंदोलन . ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रवि पी. ढवळे नवी मुंबई  जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------ नवी मुंबई :- आरपीआय आठवले गटाचे नवी मुंबईतील दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे यांनी ईलटणपाडा मधील वायरमेन राहुल मोगले मुळे नागरिकांना होत असलेला त्रास व त्यांना नोटीस न देता त्यांचे MSEB चे मीटर काढून नेने व वृध्द महिलेशी नशेमध्ये उलट सुलट बोलणे या संदर्भात सागर सोनकांबळे यांनी ऐरोली मधील MSEB मध्ये नागरिकांचा मोर्चा नेऊन अधिकाऱ्याच्या कानावर ही बाब टाकली व त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी सुद्धा केली. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा.नवी मुंबई निरीक्षक माननीय .सिद्धरामजी ओहोळ .आणि नवी मुंबई युवा अध्यक्ष.एडवोकेट यशपाल जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सागर भाऊ सोनकांबळे अध्यक्ष . दिघा विभाग यांच्या वतीने ऐरोली येथील एम एस सी बी वरती मोर्चा नेण्यात आला करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वार्ता फलकाचे अनावरण.

Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वार्ता फलकाचे अनावरण. ------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रवि पी. ढवळे नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------------ नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या अ. उ. दा. सं व सु. विभाग, डोंबिवली शाखेच्या वार्ताफलकाचे अनावरण संघटनेचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष मा. रमेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष मान. संजय मोरे साहेब, उपसरचिटणीस मान. अश्वजीत गायकवाड, संघटनेचे माजी उपसरचिटणीस दिनेशकुमार कांबळे, माजी केंद्रीय उपाध्यक्ष मान. मधुकर कांबळे व केंद्रीय उपाध्यक्ष मान. जयंत कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. फलकाच्या अनावरण प्रसंगी संघटनेच्या पनवेल मंडळ चे अध्यक्ष मान. आशिष सोरटे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या सभेत उपस्थित असलेल्या संघटनेच्या नवनिर्वाचित केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमास उपस्थित कर्मचाऱ्यांद्वारा मुख्य कार्यालयाच्या धर्तीवर राज्यातील इतर परिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या आरो

अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती मंजूर.नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे जाहीर आभार.

Image
  अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती मंजूर.नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे जाहीर आभार . ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रवि पी ढवळे नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी   ---------------------------- नवी मुंबई :-बहुजन प्रेरणा सामाजिक संस्था आणि विविध पक्ष पदाधीकारी व सामाजिक संघटनेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना जाहीर निवेदन देण्यात आले.  नेरूळ येथील ज्वेल ऑफ पार्क येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा करा, नवी मुंबईत प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छञपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळ उभा करणे, बेलापूर येथे (ऐरोली) प्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण करणे, सारसोळे बसडेपो चौक येथे अशोकस्तंभ संविधान शिल्पकृती देखावा करणे, अशा प्रकारे विविध मागण्यांचे निवेदन दिले असता, प्रतिक्रिया देताना आयुक्त म्हणाले "पुतळा उभा करण्याची प्रोसेस चालु आहे. त्याला वेळ लागेल पण नेरूळ ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभा करण्या संदर्भात तशा हालचाली चालु आहेत. आपल्या या विविध मागण्या

कुर्ल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांची सत्ता परिवर्तन सभा वंचित बहुजन आघाडीकडून टिझर रिलीज !

Image
 कुर्ल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांची सत्ता परिवर्तन सभा वंचित बहुजन आघाडीकडून टिझर रिलीज ! --------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- मुंबई -  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची "सत्ता परिवर्तन सभा" कुर्ल्यातील नेहरू नगर, एसटी आगारात पार पडणार आहे. नुकतीच मुंबईतील भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. कुर्ल्यातील आगामी सभेचा टिझर वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. राज्यात इतर राजकिय पक्षांच्या आधी वंचित बहुजन आघाडीने लागोपाठ दोन सभा घेत आघाडी घेतली आहे. या सभेत बाळासाहेब आंबेडकर कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय क्षेत्रातील जाणकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

डॉक्टरांनी त्रास दिल्याने कोरेगाव येथील व्यवस्थापक शशिकांत बोताळजी यांच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल. .

Image
  डॉक्टरांनी त्रास दिल्याने कोरेगाव येथील व्यवस्थापक शशिकांत बोताळजी यांच्या आत्महत्या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल. ------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------   कोरेगाव येथील सुप्रसिध्द कोरेगांव हॉस्पिटल मधील व्यवस्थापक शशिकांत चंद्रकांत बोताळजी, वय ३२, राहणार चिंतामणी नगर, कोरेगाव  यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी १४ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप‌करत मारहाण , जातिवाचक शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल आज कोरेगाव येथील डॉ. सुहास बाळकृष्ण चव्हाण,वय ४०, राहणार , लक्ष्मी नगर, कोरेगाव , डॉ.गणेश हरिभाऊ होळ,वय,५०, राहणार सुलतान वाडी, कोरेगाव,व गोपाळ शिवाजी साळुंखे,वय५५, राहणार पंचायत समितीच्या बाजूला, कोरेगाव यांच्या वर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील कोरेगाव ‌हॉसपीटलचा टॅक्स वाचविण्यासाठी या तिघांनी आपसात संगनमत करून  बेहिशोबी आर्थिक व्यवहार माझ्या मुलाच्या श शिकांत यांच्या नांवे अफरातफर केल्याचा मुद्दाम आळ घेतला असल्या

ब़ांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोन महिलांसह रिक्षा चालक अटक, शाहुपुरी सातारा पोलीसांची कारवाई.

Image
  ब़ांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोन महिलांसह रिक्षा चालक अटक, शाहुपुरी सातारा पोलीसांची कारवाई.   सातारा. मंगळवार पेठ, सातारा येथील बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीला १लाख३५ हजार रुपये मुद्देमालासह शाहुपुरी सातारा पोलीसांची अटक केली. बजरंग यशवंत काळे, वय ३३, राहणार मोळाचा ओढा सातारा,हा रिक्षा चालक आहे.सोमावती विजय घाडगे,वय,३०,पुनम मुकेश जाधव,वय २५, राहणार दोघी गोसावी वस्ती, सैदापुर तालुका सातारा अशी संशयित आरोपींची नावे आहेत.  ढोणे काॅलनी, सातारा येथे नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणाहून दोन महिलांनी लोखंडी साहित्याची चोरी केल्याबद्दल विजय रमेश देशमुख, राहणार चिमणपुरा पेठ, सातारा यांनी फिर्याद दिली होती.  शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार  दाखल केल्यानंतर शाहुपुरी पोलिस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमुळे धागेदोरे मिळाले. मात्र काही ठोस माहिती मिळत नव्हती. शाहुपुरी सातारा पोलीस पहाटे गस्त घालत असताना  एका रिक्षात दोन महिला संशयित रित्या फिरताना आढळून आल्या.  दरम्यान शाहुपुरी पोलिस ठाण्याचे हवालदार डमकले रात्रपाळीत असता या दोन महिला पकडून शाहुपुरी पोल

लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Image
  लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी. -------------------------------- जयसिंगपुर/प्रतिनिधी नामदेव भोसले. -------------------------------- विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा महाविद्यालय अन् तेथील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. याचा प्रत्यय  लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आला.विद्यालयाच्या आठवणीत रमलेले दिसले. पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. त्यानिमित्त परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले, हायस्कूलयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीत हायस्कूलयाच्या मानी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून, त्यांनी हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेला , एलसीडी टिव्ही सीसीटीव्ही कॅमेरे ,टेजची सजावटी सह रंगरंगोटी करून विद्यार्थी नेहमी मदत केली. या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे. दंगा मस्ती पण तेवढाच अभ्यास, मित्र-मैत्रिणींचा प्रेमळ सहवास पृथ्वीवरचा स्वर्ग

जयसिंगपूर येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार.

Image
  जयसिंगपूर येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार. --------------------------------- जयसिंगपूर/प्रतिनिधी नामदेव भोसले. --------------------------------- शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे वडार समाजातील महिले वरती बलात्कार झाल्याची घटना घडलेली आहे असलम हुसेनसाब सवनुर राहणार चिपरी या नराधमाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केलेला आहे सदर घटनेची कठोर चौकशी करून कठोर शासन व्हावे व जयसिंगपूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढता महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी व अशा मोकाट नराधमांना तात्काळ गजाआड करावे व कठोर कारवाई करण्यात यावी या घटनेतील आरोपी वरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे अशा सराईत गुन्हेगाराला गाव गुंडाला पोलीस प्रशासनाने पाठीशी घालू नये व कोणत्या ही राजकीय दबावाला बळी न पडता या मागासवर्गीय असणाऱ्या महिलेला भारत मातेच्या कन्येला भारतीय नारीला न्याय देण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचलून कठोर शासन करावे अशी मागणी वडार समाजाच्या वतीने करण्यात येत आहे

बारावीचा निकाल जाहीर: फलटण तालुक्याचा निकाल 90.23 टक्के.

Image
 बारावीचा निकाल जाहीर: फलटण तालुक्याचा निकाल 90.23 टक्के. ------------------------------ फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र फलटण प्रतिनिधी ------------------------------ फलटण.;-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालात ही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के लागला असून फलटण तालुक्याचा निकाल ९०.२३ टक्के लागला आहे. तालुक्यातून ३३०७ विद्यार्थी बारावी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २९८४ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामुळे डिस्टिंक्शनमध्ये  १०८ विद्यार्थी, फर्स्ट क्लासमध्ये ६१८ विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये १५५४तर सर्वसाधारण श्रेणीत ७०४ विद्यार्थी पास झाले आहेत.   फलटण तालुक्यातून अॖमबिशन इंग्लिश मिडियम स्कूल आणि जी ज्युनि.कॉलेज, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनि. कॉलेज कोळकी, श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मिडियम स्कूल

सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दुसऱ्यांदा अँडव्होकेट विक्रम पवार यांना संधी,तर उप सभापती पदी मधुकर पवार.

Image
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दुसऱ्यांदा अँडव्होकेट विक्रम पवार यांना संधी,तर उप सभापती पदी मधुकर पवार. नुकत्याच झालेल्या सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांच्या गटाने सर्वच सर्व जागा  १८ जिंकून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.गुरुवारी सभापती आणि उप सभापती पदासाठी निवडी झाल्या. यामध्ये पुन्हा एकदा  अँडव्होकेट विक्रम पवार यांना सभापती पदी संधी मिळाली व उप सभापती पदी मधुकर पवार यांना संधी देण्यात आली. सर्व संचालक यांच्या वतीने शंकर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.‌ यावेळी सर्व ‌संचालक तसेच अधिकारी व सचिव रघुनाथ मधले उपस्थित होते. यावेळी सभापती विक्रम पवार म्हणाले की, खिंड वाडी येथील १७ एकर जमिनीवर सुसज्ज अशी अद्ययावत मार्केट कमिटी लवकरच उभारावी म्हणून प्रयत्न करणार आहे. तसेच हमाल बांधवांसाठी हमाल भवन ‌बांधुन के. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानतो. उपसभापती मधुकर पवार म्हणाले की, निष्ठा ठेवली म्हणून

संचालक जयश्रीताई सस्ते यांचा निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

Image
 संचालक जयश्रीताई  सस्ते यांचा निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार. ----------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  गिरवी/प्रतिनिधी -------------------------------- फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणची निवडणूक नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली.यामध्ये निरगुडी गावच्या जयश्रीताई गणपत सस्ते या प्रचंड भरघोस मतांनी विजयी.  निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. यावेळी  ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सोसायटी निरगुडीचे संचालक रघुनाथ गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष लहुकुमार गोरे,श्रीमंत रामराजे युवा मंच निरगुडीचे संघटक सुनिल गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे,  अनिल गोरे, पत्रकार सुरज गोरे, अजित गोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या सर्वांनी नवनिर्वाचित संचालक जयश्रीताई गणपत सस्ते यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फलटण बाजार समितीमध्ये पारदर्शक कारभार करून सर्वांचा  विश्वास संपादन करू, अशी ग्वाही त्यांनी दैनिक रोखठोकच्या प्रतिनिधीशी  बोलताना दिली.

अमरावती विभाग राज्यात चौथ्या क्रमांकावर, ९२.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुलींची संख्या अव्वल.

Image
  अमरावती विभाग राज्यात चौथ्या क्रमांकावर, ९२.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुलींची संख्या अव्वल. ----------------------------------------------- पुंडलिकराव देशमुख. अमरावती.  विशेष प्रतिनिधी ----------------------------------------------- अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा यावर्षीचा निकाल हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पाच जिल्ह्याची व्याप्ती असलेल्या या विभागातून यावर्षी ९२.७५ विद्यार्थी टक्केवारी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी १लाख ३९हजार७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १लाख३८हजार ५६४विद्यार्थ्यां विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले तर १लाख२८हजार५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.९४ टक्के आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, व वाशिम हे पाच जिल्हे मिळून अमरावती विभागीय शिक्षण मंडळ तयार झाले आहे. यावर्षी मंडळाच्या परीक्षेवर महसूल खात्याच्या पथकांनी देखरेख केली होती. त्यामुळे कॉपीला जराही थारा नव्हता. तरीही पाच जिल्ह्यात मिळून २० कॉफी बहादूर यांना एक परीक्षेपूर्वी ठेवण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अ

धामणीत जल जीवन मिशनचा शुभारंभ ७८ लाख रुपयांची योजना ; सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
  धामणीत जल जीवन मिशनचा शुभारंभ.  ७८ लाख रुपयांची योजना ; सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन. -------------------------------------------------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र धामणी प्रतिनिधी ------------------------------------------------------------------------ धामणी (ता. माण) या गावासाठी मंजूर झालेल्या ७८ लाख रुपये किंमतीच्या जल जीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज सरपंच मारुती खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संपत खाडे, तानाजी नाकाडे, विजय खाडे भिमराव खाडे, राघू बावदाणे, आशा खाडे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच सदाशिव खाडे, माजी उपसरपंच श्रीमंत खाडे, चंद्रकांत नाकाडे, भागवत खाडे, महादेव सानप, प्रकाश खाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धामणी गावाची पिण्याच्या पाण्याची योजना गेली अनेक वर्षे रखडली होती. दोनवेळा पाणी योजना मंजूर होवूनही विविध कारणांमुळे रखडली व परत गेली होती. आता पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी ही नवीन योजना मंजूर झाली असून ती पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेअंतर्गत गावठाण, खाडे वस्ती, पिसाळवस्ती, नाकडेवस्ती आण

कोडोली (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायतच्या वतीने सन २०२२ - २३ या वर्षीच्या ५ टक्के निधीतून गावातील सुमारे २०० दिव्यांग बांधवांना निधी व साहित्य वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संपन्न.

Image
कोडोली (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायतच्या वतीने सन २०२२ - २३ या वर्षीच्या ५ टक्के निधीतून गावातील सुमारे २०० दिव्यांग बांधवांना निधी व साहित्य वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संपन्न. कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२२ - २३ या वर्षीच्या ५ टक्के निधीतून प्रति लाभार्थी २ हजार रुपये प्रमाणे २०० लाभार्थ्यांना ४ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला.त्याचप्रमाणे १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ४ लाख ५४ हजार रुपयांचे दिव्यांगाना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. कोडोली गावासह परिसरातील दिव्यांग बांधवासाठी एक सांस्कृतिक हॉल बांधण्याची मागणी निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदिप पाटील यांनी केली.या वर्षीच्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांसाठी कोडोली येथे सुसज्य सांस्कृतिक हॉल मंजूर करणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले... यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील,सुरेश पाटील,वारणा बॅकेचे संचालक प्रमोद कोरे,डॉ.प्रशांत जमने,वारणा दूध संघा

राष्ट्रध्वजाचा अपमान प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करणार -शशिकांत कुंभार

Image
 राष्ट्रध्वजाचा अपमान प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करणार -शशिकांत कुंभार ------------------------------------------ कोल्हापूर शहर विशेष प्रतिनिधी  कु.रजनी सचिन कुंभार ----------------------------------------- कोल्हापूर मध्ये 1 मे कामगार दिनानिमित्त भारत राखीव बटालियन क्रमांक 3 राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 16 मध्ये कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते त्यावेळी वरिष्ठ अधिकारी सह सर्व राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली राष्ट्र गीत संपन्न झाले तरी राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकला हि बाब कोणत्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही हि बाब गंभीर आहे याची साधी नोंदही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही वरिष्ठ अधिकारी राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकवणा-या अधिकारी डिसोजा पोलीस निरीक्षक लिपारे सह  ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पोलीस निरीक्षक. हेड कॉन्स्टेबल सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई न करता समादेशक संदिप दिवान पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.भारतीय दंड विधान संहिता 1971 प्रमाणे मा न्यायालयात याचिका

वडुज येथील ग्रामसेवक संजय विलासराव सोनावले बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.

Image
  वडुज   येथील ग्रामसेवक संजय विलासराव सोनावले बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. पंचायत समिती खटाव (वडुज) येथील कार्यालयातील विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले यास आज दिनांक २५ मे रोजी बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे ग्रामसेवक असून  संजय सोनावले हे तक्रारदार यास वारंवार वरिष्ठांना तुझा कसुर अहवाल पाठविन, तसेच  कार्यालयीन कामकाज करतांना क्षुल्लक कारणावरून चुका काढीन वारंवार त्रास देत होते. तक्रारदार यांना कारणे दाखवा नोटीस न काढणे बदल बारा हजार रुपये लाच मागितली होती. व सतत मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आज दिनांक २५ मे रोजी बारा हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.अचानक कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर कारवाई ही पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधिक्षक विजय चौधरी यांच्या आदेशानुसार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या मधील चोरीस गेलेल्या सोन्याची व रोख रक्कमेची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी घेणार का?

Image
 गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या मधील चोरीस गेलेल्या सोन्याची व रोख रक्कमेची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी घेणार का? गांधीनगर :-गांधीनगरला पश्चिम महाराष्ट्रतील सर्वात मोठी कपड्यांची  बाजारपेठ म्हणून ओळखल् जात  त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून व्यापारी कपडे खरेदी करण्यासाठी गांधीनगर मध्ये येत असतात त्यांनी खरेदीसाठी आणलेल्या रोख रकमेवर चोरट्याने हातो हात डल्ला मारला होता  त्या रकमा आज तागायत त्या व्यापाऱ्यांना परत मिळालेल्या नाहीत व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकाने परत मिळवून दिल्या नाहीत. ------------------------------------- मलईदार पोलिस ठाणे म्हणून गांधीनगर पोलीस ठाणे ओळखले जाते.या पोलीस ठाण्यात येण्यासाठी पोलीस अधिकारी धडपडत असतात  ------------------------------------- गांधीनगर बाजारपेठेत मध्य भागी गांधीनगर पोलीस ठाणे आहे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वसगडे न्यू वाडदे चिंचवाड वळीवडे मुडशिंगी उंचगाव मणेर माळ सरनोबत वाडी तावडे हॉटेल मधील पुर्व बाजू चा भाग येत असून व्यापारी व पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या गरीबांच्या मोल मजूर करून मिळवलेल्या गरीब मजुरांच्या स

यशवंत सावंत यांचा प्रामाणिकपणा! परंतु पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस पदक विजेत्या पोलिसाचा अपमान !

Image
  यशवंत सावंत यांचा प्रामाणिकपणा! परंतु पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस पदक विजेत्या पोलिसाचा अपमान ! महाराष्ट्र पोलिस पदकाचे मानकरी मा श्री दिलीप महादेव जाधव हे मेढा पोलिस ठाण्यात पाकिट हारविल्या बाबत तक्रार देण्यास मेढा पोलिस ठाण्यात गेले असता अर्ज लिहिण्यासाठी तेथील पोलिस अंमलदार व इतर सेवकांच्या कडे पेन ची मागणी केली असता त्यांना सहकार्य केले गेले नाही ह्या बाबत सेवा निवृत्त पोलिस दिलीप जाधव मेढा पोलिस ठाण्यावर नाराज झाले . ते या वेळी म्हणाले कि मी पोलिस दलात ३४ वर्षे सेवा केली माझ्या सारख्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मेढा पोलिस ठाण्यात व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर सर्व सामान्य नागरिकांना काय सेवा मिळणार अशी खंत सेवा निवृत पोलिस दिलीप जाधव यांनी मांडली  श्री दिलीप जाधव हे मुळचे भणंग गावचे रहिवासी आसून ते मेढा येथे बाजार व काही कामा निमित्त गेले असता मेढा चादणी चौकात त्यांचे पैसाचे पाकीट हरविले हे त्यांच्या लक्षात आले असता ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता वरील प्रकारचा अनुभव मेढा पोलिस ठाण्यात आला . त्या नंतर त्यांना चिंचणी चे सुपुत्र यशवंत सावंत याचा फोन आला व त्यांनी त

लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा - किरण अडागळे सातारा जिल्हा प्रतिनिधी.

Image
लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा - किरण अडागळे  सातारा जिल्हा प्रतिनिधी ------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------  सातारा ;उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथील लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा -:किरण अडागळे  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी. ---------------------------------------------------------------------------------- सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा  करा. 👇👇👇👇👇     --------------------------------------------------------------------------------- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सातारा येथील लिपिक सागर लाळगे याने पुर्वी व्हायरल व्हिडिओ मध्ये एक नंबर साहेब कमिशन घेतात असा व्हिडिओमध्ये खुलासा केला होता पण शासनाच्या परवानगी शिवाय सरकारी कर्मचारी यांना मुलाखत देता येत नाही.सदर व्हिडिओ आमच्या यु टयुब चॅनेलवर प्रदशिर्त झालाहोता व लिपिक सागर लाळगे यांच्या कारवाई करावी म्हणून तक्रार दाखल केली होती.परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण साहेब सागर लाळगे यां

आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? नितेश राणे

Image
 आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? नितेश राणे.   -------------------------------- नाशिक प्रतिनिधी -------------------------------- नाशिक : – ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावण्यात आले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणे  यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीपासून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, सद्यस्थितीत शिल्लक सेनेला आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? अशी टीका नितेश राणे यांनी केली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्रीसांगतात की ठाकरे सेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष, मग आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.भाजप आमदार नितेश राणे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात  दर्शन घेत महाआरती केली. यावेळी हिंदु संघटना उपस्थित होत्या. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर  निशाणा साधला. दरम्यान दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाच्या   इमारतीवरुन राऊतांनी

सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची पदोन्नती!

Image
 सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची पदोन्नती! कोल्हापूर कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक असताना अनेक गुन्हेगारांना गजाआड करुन बेकायदेशीर धंद्यावर वचक निर्माण केली होती सध्या सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले श्री संजय गोर्ले यांची  पदोन्नती होऊन राज्य गुन्हे अन्वेषण सीआयडी कोल्हापूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते गुरुवारी किंवा शुक्रवारी आपला पदभार स्वीकारतील तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर सांगली जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्यात असून प्रामुख्याने कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूर जिल्हा सांगली येथे तर सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टेके यांची कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे राज्यातील 262 पोलीस उपाअधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये 143 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती तर 119 पोलीस उपाअधीक्षकांच्या राज्यात अन्यत्र बदल्या करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट.

महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट.

Image
  महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र सातारा प्रतिनिधी किरण अडागळे ------------------------------------- सोमवारी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी महाबळेश्वर येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील जनरल वार्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, रक्तपेढी, सिटी स्कॅन, एक्सरे या विभागाची पाहणी करून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारि यांना महात्मा फुले आरोग्य योजना त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी संचालक फादर टाॅमी करिअलकुलम यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारि, पोलिस अधीक्षक समीर शेख, व्यवस्थापक जितीन जोश, डॉ, सुनील पिसे, डॉ.सिजो जान, डॉ.मंगला अहिवळे, डॉ, नरेंद्र तावडे, डॉ.रेशमा नदाफ, डॉ.शयाल पावसकर यांच्या सह रुग्णालयातील सेवक उपस्थित होते. यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यपाल रमेश बैस यांनी गारमीण भाग