अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे काम थांबल्यामुळे आश्चर्य.

 अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे काम थांबल्यामुळे  आश्चर्य.

---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

नुकताच पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील शेकडो  अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देवुन चोवीस तासाचा अल्टिमेट देवुन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी कारवाई न केल्याने नागरिकांनी महसूल विभागाच्या कारभारावर टीका केली. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील भले मोठे रिसाॅरट सील केल्यानंतर गेले पंधरा दिवस कारवाई  थांबवली आहे. या कारवाया थांबवण्यासाठी गौडबंगाल काय आहे? सर्व कारवाया मॅनेज करण्यात आल्या की काय अशी शंका व चर्चा नागरिकांमध्ये आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर पंचनामे होवून पाचगणी परिसरातील ११७ अनाधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुक्यातील ४०० पेक्षा जास्त अनाधिकृत बांधकामाच्या याद्या तयार करण्यात आल्या मात्र त्यानंतर ‌ही कारवाई आजतागायत थांबली आहे. गेली पंधरा दिवस प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्यामुळे अनाधिकृत बांधकामाच्या कारवाई चे काय झाले? याबाबत प्रशासन कोणतीच माहिती देत नाही. स्थानिक पातळीवर जनतेच्या बांधकामाबाबत निर्णय घेण्यासाठी जरी थांबले तरीही बाहेरून आलेल्या  धनदांडगे यांच्या अतिक्रमणांना प्रशासन अभय देणार का? असा‌ प्रश्न निर्माण झाला आहे. आणि महाबळेश्वर तहसीलदार  यांना काही दिवसांपासून मुद्दाम रजेवर गेल्या आहेत अशी खात्रीलायक बातमी आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.