भणंग:जावली तालुक्यातील मुलें -मुलींही स्पर्धा परिक्षांमध्ये सध्या चमकू लागली आहेत.

 भणंग:जावली तालुक्यातील मुलें -मुलींही स्पर्धा परिक्षांमध्ये सध्या चमकू लागली आहेत.


-----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेतलेल्या कृषी विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया परिक्षेत मौजेओखवडी ता .जावली येथील कु . सायली रविंद्र शेलार हिने महाराष्ट्र राज्यायात १०२ क्रमांकाचे मानांकन मिळवून मोठे यश संपादन करत जावलीच्या शिरपेचात मानाचा तुरा झळकवला आहे .                    कु . सायली शेलार कोणतीही खाजगी शिकवणी न लावता केवळ जिद्द व खडतर परिश्रमाच्या जोरावर घरीच अभ्यास  करून हे उज्वल       यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे . घरात कोणीही उच्चशिक्षित मार्गदर्शक नसताना स्वतःचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारणाऱ्या सायलीचे प्राथमिक शिक्षण जि .प. प्रा . शाळा ओखवडी   येथे तर माध्यमिक शिक्षण केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यालयात झाले .निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी सरपंच कै . दत्रात्रय सदाशिव शेलार ( ड्रायव्हर ) यांची सायली नात आहे . कु .सायली रविंद्र शेलार हिची कृषी अधिकारी ( गट१ ) या पदावर नियुक्ती  झाल्या बद्दल सातारा -जावलीचे आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले , आ . शशिकांत  शिंदे , मा .आ . सदाशिव सपकाळ, सातारा डी .सी .सी. बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , जि .प. मा . शि .सभापती अमित कदम , युवा नेते शशिकांत शेलार , ओखवडीचे सरपंच , उपसरपंच , पो .पाटिलं यांनी अभिनंदन केले आहे . 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.