कासपठारावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश!
कासपठारावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश!
सातारा : - जागतिक वारसा लाभलेल्या कासपठार निसर्ग सौंदर्य, जैवविविधता संवर्धन करण्याऐवजी बांधकाम नियमित करण्यासाठी हालचाली राज्य पातळीवर सुरू होत्या. याबाबत राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तक्रारीची दखल घेऊन कास यवतेश्वर मार्गावरील बेकायदा बांधकामाला पाडण्याचे आदेश सातारा तहसीलदार व प्रांताधिकारी सातारा यांना जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कासपठार परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे झाली असून सांडपाणी व्यवस्थापन नाही व त्यामुळे एसटीपी प्लॅन नसल्याने जलप्रदूषण होते आहे. सरकारने कास पठार साठी अधिकृत बांधकाम विषय नियमावली तयार करावी. पुर्वीचे बांधकाम पाडून नव्या बांधकाम नियमानुसार बांधकामांना परवानगी द्यावी. बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासन ठोस भूमिका घेत नसल्याचे अँडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत राष्ट्रीय हरित लवाद यांच्या कडे याचिका दाखल करण्यात आली. सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत कास यवतेश्वर मार्गावरील बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले असून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश सातारा तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले आहेत, असेही सुशांत मोरे यांनी सांगितले. संबंधित अधिकारी यांना वेळकाढूपणा न करता कारवाई करावी अन्यथा कात्रज घाट दाखवु असा इशारा सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Comments
Post a Comment