शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम!
शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम!
भणंग : - जवळ- जवळ ४५ वर्षे शिव जयंती निमित्त शिव ज्योत आणण्याचे परंपरा हनुमान मंडळांनी कायम ठेवली आहे
छत्रपती. श्री. शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधले , स्वराज्य निर्माण केले
त्याच धरतीवर १९७५ ते १९७६ च्या दरम्यान तोरणा किल्ल्या वरूनच प्रथम शिव ज्योत आणण्यास प्रारंभ केला .
प्रतापगड , सिंहगड , रायरेश्वर , अजिंक्यतारा , सज्जनगड , तुळजापुर , वर्धनगड ' जंजिरा , अश्या अनेक गडावरून शिवज्योत आणून परंपरागत शिव जयंती उत्सव साजरा केला जातो . त्या काळी ही वेशभूषा व ऐतिहासिक मराठी चित्रपट दाखवले जायचे . तोच आनंद , तोच उत्साह तरुणांचे सळसळते रक्त ' , हनुमान उदय मंडळाचे कार्यकर्त्यां मध्ये आजही सळसळत आहे
देवगिरी [ छत्रपती संभाजी नगर ] ते भणंग [ राजधानी सातारा ] तीन रात्र दोन दिवस रात्र धावत अंतर कापून देवगिरी ते भणंग शिवज्योतीचा प्रवास केला . दि . २२ / ०४ / २०२३ रोजी शिवजयंती दिवशी भणंग मध्ये शिवज्योत दाखल झाली . गावातील महिला वर्गानी शिव ज्योतीचे पंचाआरती ने ओवाळून जय घोषात स्वागत केले ,मुलींनी वेशभूषा करून कार्यक्रमाला रंगत आणली . दिवसभर स्पिकर वर शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे याचे पोवाडे लावून वातावरण शिवमय केले . संध्याकाळी पालखीतून छ , शिवाजी महाराजांची व शिव ज्योतीची ढोल - ताशांच्या गजरात आणि छत्रपतींचा भगवा हातात घेवून एका तालात , गजरात तरुण वर्गानी तन -मन - धन एकत्र करून नाचत होते . संपुर्ण गावातून मिरवणूक झाल्या नंतर , सरसेनापती हंबीरराव मोहिते हा ऐतिहासिक मराठी चित्रपट दाखविण्यात आला आणि शिवकाळातल्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा मिळाला .
छत्रपती.श्री.शिवाजी महाराज कि जय
जय शिवाजी जय भवानी !
Comments
Post a Comment