ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती कोडोली मध्ये संपन्न.

 ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती कोडोली मध्ये संपन्न.

 कोडोली (ता.पन्हाळा) येथे पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी केली जाते. या भव्य शिवजयंती मिरवणूकीचा शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष,छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची (परंपरेनुसार) शिवजयंती साजरी केली जाते.कोडोली येथील वैभवनगर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे,रणजित पाटील,प्रकाश पाटील,अमर पाटील (बाबा),निखिल पाटील,ग्रामपंचायत सदस्य डॉ.प्रशांत जमणे,माणिक मोरे,प्रविण जाधव,प्रविण पाटील,प्रकाश कापरे,महेश पाटील यांच्यासह कोडोली गावातील सर्व तरूण मंडळे, कोडोली गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.