वळीवडे हद्दीत सुरू असणाऱ्या नियमबाह्य व विनापरवाना बांधकामावर कारवाई करा: दलित महासंघ.
वळीवडे हद्दीत सुरू असणाऱ्या नियमबाह्य व विनापरवाना बांधकामावर कारवाई करा: दलित महासंघ.
गांधीनगर:-वळीवडे ता करवीर गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या विनापरवाना , नियमबाह्य आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करा. अशा मागणीचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने प्रभारी ग्रामसेवक अशोक मुसळे व उपसरपंच शरद नवले यांना देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर निदर्शने करण्यात आली. याचे नेतृत्व दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.
निवेदनात म्हटले आहे की वळीवडे हद्दीत गट नंबर 192/1 शंकरलाल गिरधारीलाल पंजवानी, गट नं.125/5 मनप्रीतसिंह मैदिरता, गट नंबर 183/4 रोशन नंदलाल निरंकारी, गट नंबर 183/2 श्रीचंद द्वारकादास लुलानी, यांच्यासह अन्य काही बांधकाम धारकांनी संबंधित विभागाची परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे बांधकाम सुरू केले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यातील काहींना ग्रामपंचायतीने नोटीसा बजावूनही बांधकाम धारकांनी त्याला केराची टोपली दाखवत नियमबाह्य बांधकामे सुरूच ठेवली आहेत. याकडे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात ही नियमबाह्य बांधकामे जमीनदोस्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण आंदोलन करू असा इशारा दलित महासंघाचे राजू कांबळे यांनी दिला. यावेळेस बहुजन समता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब कांबळे, शहर उपाध्यक्ष अनिल हेगडे, सागर बुरुड, गौरव लोखंडे, अर्जुन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ गुरव, भैया इंगवले आधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment