Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बीट अंमलदार अमरसिंह पावर यांची तात्काळ बदली रद्द करण्यासाठी शिवशक्ती भिम शक्ती एकत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले निवेदन.

 बीट अंमलदार अमरसिंह पावर यांची तात्काळ बदली रद्द  करण्यासाठी शिवशक्ती भिम शक्ती एकत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले निवेदन. 

--------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

शाहूवाडी,:करंजफेण बीट अंमलदारांची बदली रद्द करण्याची मागणी.

शिवबाचा मावळा संघटनेचे तालुका  अध्यक्ष किरण कारंडे शिवशक्ती भीमशक्ती  यांच्या  अध्यक्षतेखाली  कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. 

की येथील पोलिस ठाणे अंतर्गत करंजफेण बीट अंमलदार अमरसिंह पावरा यांची झालेली बदली रद्द करण्याची मागणी शिवबाचा मावळा, शाहुवाडी तालुका संघटना शिवशक्ती भीमशक्ती व कासारी खोरा ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. तसे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले .  . निवेदनात म्हणालेआहे की वर्षभरापूर्वी करंजफेण येथे आलेले बीट अमलदार श्री. अमरसिंह पावरा हे कर्तव्यात कोणतीही कसूर करत नाहीत. करंजफेण सारख्या दुर्गम भागात रात्री-अपरात्री येवून कर्तव्य बजावतात. ठाण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर एखादा तंटा, वाद झाल्यास  त्यावर सामंजसाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात. लोकांना समजावत तंटा मिटविण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरापासून त्यांचे शाहुवाडी दुर्गम भागातील लोकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. अशा कर्तव्यदक्ष श्री. पावरा यांची बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत रद्द करावी.  अशी मागणी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांना देण्यात आले होते हे निवेदन शिवबाचा मावळा संघटना शाहुवाडी तालुका अध्यक्ष किरण कांरडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले होते परंतु याकडे दुर्लक्ष करून त्यांचे स्थानिक गावाचा बीट अमलदार म्हणून का नेमले आहे याचे याची चौकशी करावी व बीट अमलदार अमरसिंह पावरा यांची नेमणूक करंजफेन म्हणून करावी असे निवेदन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. यावेळी अक्षय सुतार, राकेश सुतार, किरण सुतार, संतोष पाटील, सहदेव साळोखे, प्रशांत पाटील, किरण पाटील, दिगंबर वरेकर, गोविंद सुतार, प्रदीप पाटील, प्रदीप कारंडे, भगवान पाटील, अविनाश सुतार, विक्रम कारंडे, शिवबाच्या मावळा शाहुवाडी तालुका महिला अध्यक्षा आंबुबाई पाटील आदीनी दिले निवेदन

Post a Comment

0 Comments