सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरून पडून रूग्णाचे निधन.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरून पडून रूग्णाचे निधन.
सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने सचिन ज्ञानु बडेकर (वय,४१, राहणार मल्हार पेठ, सातारा) यांचे निधन झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन ज्ञानु बडेकर हे आजारी असल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दुसऱ्या मजल्यावर असताना रविवारी (दिनांक 23) रोजी ते खिडकीतून बाहेर पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment