Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जयसिंगपूरला अतिक्रमणचा विळखा.नगरपालिका प्रशासनाचे व ट्राफिक पोलीस यांचे दुर्लक्ष : वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळे.

जयसिंगपूरला अतिक्रमणचा विळखा.नगरपालिका प्रशासनाचे व ट्राफिक पोलीस यांचे दुर्लक्ष : वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळे.

---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपूर: प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------------

जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य क्रांती चौकाबरोबरच शिरोळ-वाडी रोडवर अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे. विनापरवाना डिजिटल फलकांचादेखील यात समावेश आहे. अशा अतिक्रमणाबाबत कोणतीही उपाययोजना नगरपालिकेकडून केली जात नसल्याने विद्रुपीकरणात घडल्याची चर्चा आहे. भर पडत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण फुटपाथवर आणि नागरिक रस्त्यावर, असे काहीसे चित्र पहावयास मिळत आहे.

शहराचे मध्यठिकाण असलेला क्रांती चौक अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गुदमरलेला असतो, या चौकात असलेल्या अतिक्रमणाला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे ती काढण्याचे कोणी धाडस दाखवत नाही. वर्षानुवर्षे शिरोळवाडी रोड अतिक्रमण केलेले नगरपालिकेची जागा जणू स्वतःचीच असल्यासारखी तीन तीन चार चार लाख रुपये ला कब्जाधारकांनी विकली गेली आहेत

सांगली-कोल्हापूर महामार्गावर देखील मोठमोठे फलक-साईन बोर्ड उभे करून रस्त्यात अडथळे ठरत आहेत. कारवाईचे धाडस प्रशासन दाखवत नाही. दिवसेंदिवस नवीन टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या वाढू लागल्याने नवीन समस्या निर्माण होत आहेत.

शहरातील शिरोळ-वाडी रोडवर पादचान्यांसाठी लाखो रुपये खर्चून पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत; मात्र खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी याठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे फुटपाथ गायब झाले आहेत. विक्रेते फुटपाथवर नागरिक रस्त्यावर असे दिसत आहे.पहावयास मिळत आहे. या खाद्यपदार्थ गाड्यांसमोर बेशिस्त लावण्यात आलेल्या वाहनांमुळे या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडीदेखील होत आहे. एकूणच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करते; परंतु मोकळ्या शासकीय जागांवर अतिक्रमणे करून दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, रहदारीची वाढती समस्या लक्षात घेऊन तसेच शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी 'अतिक्रमण हटाव' मोहीम राबवावी, असे  जनतेतून मागणी आहे.

फुटपाथवरही अतिक्रमण जयसिंगपूर शहरात शिरोळ,नववी गल्ली ते तेरावी गल्ली, स्टॅन्ड चौक,या ठिकाणी फुटपाथवरही दुकानदारांना अतिक्रमण केले आहे. व्यावसाय थाटले आहेत. याकडे नगरपालिका गांभिर्याने पहायला तयार नाही. अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई होताना दिसत नाही. नगरपालिका प्रशासनाने तातडीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहिम राबवावी अशी मागणी नागरिकामधून होत आहे.

Post a Comment

0 Comments