जयसिंगपूर मधील तंबाखू प्रक्रिया विरुद्ध उच्च -न्यायालयात जण हित याचिका दाखल.
जयसिंगपूर मधील तंबाखू प्रक्रिया विरुद्ध उच्च -न्यायालयात जण हित याचिका दाखल.
--------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
राहुल कांबळे
--------------------------------
जयसिंगपूर शहरातील नागरिवस्ती मध्ये असणारे तंबाखू प्रोसससिंग युनिटच्या प्रदूषण मुळे नागरिकांच्या आता जीवाशी आले आहे. जयसिंगपूर हे शहर छत्रपती शाहू महाराजांनी तंबाखू विक्री साठी वसवलेले होते. पण काही लोकांनी तंबाखू विक्री न करता तंबाखू प्रोसससिंग सुरु केले आहे.आणि या प्रोसेसिंग युनिट नागरी वस्ती मध्ये शाळेच्या अवती भावती असलल्याने या युनिट मुळे होणाऱ्या प्रदूषणाने लहान मुलाच्या व त्याठिकाणी वास्तवयास असणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे आपला हक्क संघनटेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी सांगितले आहे.
जवळ पासून दहा ते पंधरा वर्षांपासून तेथे वास्तवयास असणाऱ्या नागरिकांनी या व्यापाऱ्यांच्या विरोधात कित्येक वेळा तक्रारी देऊन देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जयसिंगपूर नगरपालिके कडून ना हरकत दाखला लबाडी करून मिळवला असल्याचे समोर आणून देखील नगरपालिका दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आपला हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले आम्ही कित्येक महिन्यापासून प्रशासकीय पाठपुरावा करून वारंवार आंदोलन करून देखील प्रशासन या पैश्यानी बलाढ्य व्यापाऱ्यांन समोर हतबल झाले आहे. म्हणून आम्ही दिनांक 12/04/2023 रोजी उच्च न्यायालयात जण हित याचिका दाखल केली आहे.तसेच न्यायालय योग्य बाजू बघून नागरिकांच्या बाजूने निर्णय देईल आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
इतक्या वर्षांपासून नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार देऊन देखील प्रशासनाने कोणतीही करावाही केली नाही आता न्यायदेवता काय निर्णय देणार या कडे नागरिकांचे लक्ष वेधून राहिले आहे.
Comments
Post a Comment