दोन दुचाकीस्वारांची पोलिसांसमोर मारामारी.
दोन दुचाकीस्वारांची पोलिसांसमोर मारामारी.
सातारा गोडोली जकात नाका येथील चौकात एकमेकांच्या गाडींला धक्का लागला म्हणून दोघेही वाहतूक पोलीस वाहतूक बंदोबस्त करण्यासाठी तैनात असताना त्यांच्या समोर भांडत होते.हे प्रकरण हमरीतुमरीवर येवून वाहतूकीस अडथळा निर्माण करीत सायं पाचच्या सुमारास दोघे मोटरसायकल स्वार भांडत होते.या ठिकाणी सातारा वाहतूक पोलीस बंदोबस्त करीत असलेले वाहतूक पोलीस बनगर व रविंद्र माने यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून दोघां मोटारसायकल स्वांरांच्यावर गुन्हा दाखल केला.
Comments
Post a Comment