सातारा येथील अजंठा चौकात असलेल्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर तसेच मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल.

 सातारा येथील अजंठा चौकात असलेल्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर तसेच मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल.

------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------

सातारा येथील गोडोली भागात असलेल्या अजंठा चौकात हाॅटेल प्रितीमागे असणार्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या भानगडीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अजंठा चौकात द हिडन कॅफे नावाचा कॅफे असून येथे अश्लील पार्टी चालते अशी पोलीसांना मिळाली. काही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करीत असल्याचा संशय आल्याने द हिडन कॅफे मध्ये गेले असता काही युवक व युवती व हीडन  कॅफे मध्ये अश्लील चाळे करीत होते. पोलीसांनी अचानक छापा टाकला व याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालक विक्रम निकम वय २२, राहणार शिवाजी चौक, पुसेगाव तालुका खटाव, कॅफे मालक आशुतोष हिंदुराव माने, राहणार जुनी एम.आय.डी.सी.सातारा.तसेच कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रकाश केदारी कागिलगर, राहणार नागेवाडी, तालुका सातारा,शुभम विष्णू शिंदे राहणार  किनही तालुका कोरेगाव यांचेवर बेकायदेशीर रित्या अश्लील उद्योग चालवीत असलेबददल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी फिर्याद दिली आहे.दिनांक २१एप्रिल रोजी दुपारी २.३० चे सुमारास द हिडन कॅफे मध्ये अश्लील भानगडी होत असल्याचे समोर आल्यावर रिपाइं पदाधिकारी यांनी तोड फोड केली.तयामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तातडीने पोलिस दाखल झाले. व द हिडन कॅफे मधुन  शुक्रवारी सायंकाळी एक युवक व युवतींना पकडल्याने खळबळ उडाली.या प्रकारातून दोन मुलींची सुटका करण्यात आली.  घटनेचे गांभीर्य ओळखून डि.वाय.एस.पी. गणेश किंदरे यांनी तपासाबाबत सुचना दिल्या.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.