फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र बातमीचा इफेक्ट. तात्काळ स्वच्छता सुरू.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र बातमीचा इफेक्ट. तात्काळ स्वच्छता सुरू.
सातारा;-येथील विलासपुर भागात असलेल्या कारंजकर नगर येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या गटारांची स्वच्छता गेले कित्येक महिने केली नव्हती. याबाबत आमचे सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी लेखी तक्रार दिली होती व त्याचा पाठपुरावा केला होता. विलासपुर भागात असलेल्या या गटारी मुळे शेजारी असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते. तसेच अंगणवाडी शेजारी गटार असल्याने छोट्या मुलांना पण त्रास होत होता. वारंवार समक्ष भेटून ही स्वच्छता होत नाही. पण आमचे सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला व काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे आज नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचारी पाठवून स्वच्छता करून घेतली. यामुळे परिसरातील नागरिकांनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र. या राष्ट्रीय चॅनलचे आभार मानले.
Comments
Post a Comment