Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन.

 'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन.

नवी मुंबई :- (आयसीएसआय - सीसीजीआरटी), सेक्टर १५, सीबीडी बेलापूर येथे वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (नवी मुंबई) आणि सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिसर्च अँड ट्रेनिंग ह्यांच्या  संयुक्त विद्यमाने 'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर पूर्ण एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वाशी येथील  एमजीएम हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. 

या परिसवांदामध्ये (सीएस) विनिता नायर (सीनियर पार्टनर - विनोद कोठारी अँड कंपनी), (सीए) वंदना चौधरी (सहाय्यक व्यवस्थापक - सेबी) आणि डॉ.  (सीएस) किरण सोमवंशी (सहाय्यक - महाव्यवस्थापक, इकॉनॉमिक टाइम्स इंटेलिजन्स युनिट) या वक्त्यांनी वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या विविध पैलूंवर महत्वपूर्ण प्रकाश टाकला. यावेळी सदर परिसवांदाचा उपस्थितांनी मनापासून आनंद घेऊन परिसवांदामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला.  

आयसीएसआयचे अध्यक्ष (सीएस) मनीष गुप्ता हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा उच्च दर्जा सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिकांच्या निर्मितीमध्ये आयसीएसआय च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. या परिसवांदामध्ये (सीएस) बी. नरसिंहन (उपाध्यक्ष - आयसीएसआय), (सीएस) प्रवीण सोनी (भूतपूर्व अध्यक्ष, आयसीएसआय-सीसीजीआरटी, आणि केंद्रीय परिषद सदस्य), (सीएस) राजेश सी. तारपारा (अध्यक्ष, आयसीएसआय-सीसीजीआरटी आणि केंद्रीय परिषद सदस्य) व  (सीएस) अमृता डी.सी. नौटाल (अध्यक्ष,आयसीएसआय - डब्लूआयआरसी) यांनी भाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

(सीएस) प्रियंका यादव (अध्यक्ष, नवी मुंबई चॅप्टर) यांनी गेल्या वर्षभरात चॅप्टरने केलेल्या विविध कामगिरीवर प्रकाशझोत टाकला. (सीएस) प्रियंका यादव ह्यांनी सांगितले, चॅप्टरने चालू वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत 4 पूर्ण-दिवसीय सेमिनार आणि 3 स्टडी सर्कल बैठका घेतल्या. (सीएस) प्रियंका यांनी नवी मुंबई चॅप्टरच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आणि आयसीएसआय-सीसीजीआरटी च्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रम आणि प्रयत्नांचे आणि सहभागींच्या सहभागाचे कौतुक केले. 

(सीएस) संतोष भट्टाचार्जी (सचिव) यांनी नमूद केले की चॅप्टरने चालू वर्षात 12 सेमिनार आणि 12 स्टडी सर्कल मीटिंग्ज आयोजित करण्याची योजना आखली आहे. तरी कंपनी सेक्रेटरीजनी ह्या संधीचा फायदा घ्यावा असे त्यांनी नमूद केले. 

सीएस कुश गुप्ता (उपाध्यक्ष), सीएस विपुल कुमार सिंग (कोषाध्यक्ष), सीएस पूजा सिंघल (पीडीसी अध्यक्ष), सीएस खुशीराम डी. जाधवानी आणि सीएस ज्योती एल. प्रजापती आदी व्यवस्थापकीय समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments