कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी विकासाचे केंद्र व्हावे.- गजानन बिडकर.

 कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी विकासाचे केंद्र व्हावे.- गजानन बिडकर.

कोल्हापूर :-कोल्हापूर शहर कुंभार  माल उत्पादक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक लागली असून श्री संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज 22/04/2023 रोजी सकाळी संत गोरा कुंभार वसाहत मधील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.

संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनल कडून प्रास्ताविक सादर करताना किरण माजगावकर त्यांनी प्रचाराच्या शुभारंभासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत ते असे म्हणाले.निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले त्यासाठी शाहूपुरी कुंभार गल्लीत मीटिंग बोलवण्यात आली होती परंतु सत्तारूढ संचालकाकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यांचे उत्तर आम्हाला आले की आम्ही आता फार पुढे आले आहोत त्या व्यकत्यावर किरण माजगावकर यांनी मिश्किल टिपणी केली आम्ही पुढे आलो आहोत म्हणजे खुर्चीसाठी काय असं वक्तव्य करतात जमलेल्या सर्व सभासदाने टाळ्यांचा कडकडाट केला.

-------------------------------------------------------------------------

निवडणूक लागली नाही तर ती सभासदांच्या वर लादली आहे

-------------------------------------------------------------------------

निवडणूक लागली नाही तर ती सभासदांच्या वर लादली आहे.सभासदांच्या वर तीन ते चार लाख रुपये या निवडणुकीपायी खर्च लादला जाणार आहे त्याला कुठेतरी अटकाव करता यावा या उद्देशाने सत्तारूढ मधील चार नवीन पॅनल मधील चार व इतर तीन संचालक घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रयत्न केला पण त्याला सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शवली नाही म्हणून ही निवडणूक लागली असल्याचे किरण माजगावकर यांनी सांगितले.

सत्तारूढ मंडळाच्या संचालकांची मान्यता मिळाली नाही म्हणून कलस्ष्टर योजना बारगळली.कुमावत  क्रेडिट सोसायटी चे संचालक. एम व्ही कुंभार.

-----------------------------------------------------------------------------------

कलस्ष्टर योजनेची फाईल तयार होती त्यासाठी दिड ते दोन लाख रुपये खर्च आमच्या काही नेत्यांनी केला होता 100 कोटींच्या पटीत कोल्हापूर शहर माल उत्पादक सहकारी सोसायटीला मंजूर करतो असा शब्द दिल्लीवरून  दिला होता फक्त त्यासाठी संचालक मंडळाची मान्यता पाहिजे होती पण संचालकांच्या भीतीने आपली मालमत्ता अट्याच होईल या भीतीनं त्याला थोडासा अटकाव झाला परंतु आता या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूक मुळे परत संधी चालून आली आहे शासनाची 95% व आपली पाच टक्के रक्कम सोसायटीला भरायची आहे 95% अनुदान  मिळणार आहे,त्यातुन भव्य असे सभागृह बांधता येईल आपल्या भगिनींना रोजगार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता येईल असे मत.  कुमावत क्रेडिट सोसायटी चे संचालक. एम व्ही कुंभार. मांडले   

आमचे नेते प्रकाश सरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवार्षिक निवडणूक संपूर्ण 11 संचालक मातब्बर नेत्यांना हरवत एकहाती सत्ता स्थापन केली.परंतू कोणताही निर्णय घेताना आमच्या पॅनल प्रमुखांना जाणून बुजून  डावलण्यात आले  अशी खंत सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सर्जेराव निगवेकर यांनी बोलून दाखवली संस्था कशासाठी असते संस्था सभासदांच्या विकासासाठी असते.याचा सभासद बंधूंनी विचार करावा.बाहेरून निधी आणण्याचे काम आपल्या भागाचा विकास प्रकाश सरवडेकर करू शकतात म्हणूनच संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनलच्या सर्व  उमेदवारांना विजयी करा असे मत सर्जेराव निगवेकर यांनी मांडले.

 कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी विकासाचे केंद्र व्हावे.- गजानन बिडकर.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक  सोसायटी ला विकासाच केंद्र करायचं सत्तारुढ .संचालक मंडळाची सहकार्य करण्याची भूमिका नव्हती म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावता आली नाहित सकारात्मक भूमिका जर संचालक मंडळाचे नसेल तर विकास कामे होणे अवघड आहे ब वर्ग मधून संस्था अ वर्ग मध्ये का आली नाही जर अ वर्ग मध्ये संस्था आली असती तर राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेता आला असता सर्व सभासद बंधूंनी या गोष्टीचा विचार करावा.जर सोसायटीला अ वर्ग मध्ये आणायचे असेल सभासदांच्या हिताचा कारभार करायचा असेल तर संचालक मंडळ हे सकारात्मक पाहिजे असे मत संस्थेचे सभासद गजानन बिडकर यांनी व्यक्त केले जात ‌‌.‌

कुंभार समाजाचे ऋण मी कधीच विसरणार नाही. माजी नगरसेवक प्रकाश सरवडेकर.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनल चे प्रमुख व माजी परिवहन सभापती व कुमावत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश सरवडेकर हे आपल्या भाषणात म्हणाले की मि आपल्या सहकार्यामुळे सोसायटीचा संचालक महानगरपालिका चा नगरसेवक आणि  आज पॅनल प्रमुख म्हणून आज या पदापर्यंत पोचले आहे याची मला जाणीव आहे म्हणून मी बापट कॅम्प शाहुपूरी पापाची तिकटी ऋणमुक्तेश्वर दत्तगल्ली लक्ष्मी गल्ली मधील बंधू भगिनी यांच्या सहकार्याने व वडीलधारांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो  आहे हे मी कधीच विसरू शकत नाही माझ्या हातून अनेक विकासकामे मार्गी लाली आहेत आणि इथून पुढे समाजाच्या हितासाठी मि सदैव जिवांचे रान केल्याशिवाय राहणार नाही असे मि आपल्याला वचन देतो असे ते म्हणाले संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनेल चे सर्व उमेदवार निवडून येणार व विकास कामे ही घडणार याचा मला आत्मविश्वास आहे आत्मविश्वास का आहे कारण माझ्या मागे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मित्रांची मदत आणि सभासदांचा पाठिंबा या बळावर मी ही निवडणूक शंभर टक्के निवडून येणार अशी मला खात्री आहे.

---------------------------------------------------------------

विघ्न संतोषी लोकांच्यामुळे विकास कामे आडणारच !

----------------------------------------------------------------

उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे विरोधी पक्ष नेते व नगरसेवक माननीय विलास वास्कर आपल्या भाषणात विघ्न संतोषी लोकांच्यामुळे विकास कामे आडणारच ! असे म्हणाले.राजारामपुरी मध्ये कुंभार समाज नसतानाही माझ्यासारखा कुंभार समाजातील उमेदवार निवडून येतो समाजामध्ये एकी निर्माण झाली पाहिजे. येथे दुफळी माजली आहे..काम करणारा माणूस आपल्याजवळ असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपलाच असणार आहे असे मत माननीय विलास वासकर यांनी मांडले.

 संत शिरोमणी परिवर्तन पॅनलच्या उद्घाटन प्रसंगी माननीय विलास वासकर, प्रकाश सरवडेकर , संजय काका निगवेकर, दत्तात्रय सरवडेकर मनोहर यमगरर्णीकर ,तज्ञ संचालक संभाजी आरेकर,सुनील माजगावकर ,अमोल माजगावकर, विजय बिडकर, गजानन बिडकर, सर्जेराव निगवेकर, विलास म्हारूळकर   लक्ष्मण वडणगेकर,मनोज माजगावकर, रत्नाकर माजगावकर, सुहास भोगावकर, राजू आरेकर नाना आरेकर प्रकाश कातवरे, जितू कातवरे, नाना आरेकर, अनिल यमगरर्णीकर ,राजू  करड्याळकर, आनंदराव बोरपाडेकर, कृष्णात माजगावकर, राजू बडोदेकर, प्रभाकर चंदगडकर, उदय माजगावकर, आनंदराव ऐतवडेकर, स्वप्निल पाडळकर, मनोज माजगावकर, महादेव कुंभार कुडित्रेकर किरण हनीमनाळकर दत्तात्रय कुंभार कुडित्रेकर.रत्नाकर माजगावकर, कुमावत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक कुंभारमाल उत्पादक सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक व संत शिरोमणी गोरोबा काका परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार संस्थेचे सर्व सभासद बंधू भगिनी व भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.