राजाराम चे कारभारी महाडिकच.

राजाराम चे कारभारी महाडिकच.

--------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा, च्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाडिक गटाने आपली सत्ता अबाधित ठेवली. माजी मंत्री सतेज पाटील यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अतिशय आक्रमक भूमिका घेत जोरदार लढत दिली. मात्र 122 गावातील सभासदांनी स्पष्ट बहुमत देत महाडिकगटावर आपला विश्वास कायम ठेवला. या निवडणुकीत पारंपारिक विरोधक मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांचा कलगीतुरा जोरदार गाजला. तर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे एकमेकांना बिंदू चौकात येण्याचा आव्हान देखील खूप गाजले. शेवटच्या टप्प्यात मुन्ना महाडिक आणि महादेवराव महाडिक यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाची प्रचिती निकालातून दाखवून दिली. सतेज पाटील गटाने या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलंच हैराण केलं होतं. मात्र 27 वर्षाची अबाधित सत्ता प्रदीर्घ अनुभव आणि स्वतः महादेवराव महाडिक यांचा शेवटच्या क्षणी सभासदांना घातलेला साद निकालासाठी महत्त्वपूर्ण ठरला. सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाने 21 ते 21 जागा जिंकत निकालापूर्वीची चुरस आणि अंदाज यातील फरक स्पष्ट केला.



राजाराम चे कारभारी महाडिक

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.