उचगाव खून प्रकरणातील संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी.आणखीन एक आरोपी जेरबंद आरोपींची संख्या सहा.

 उचगाव खून प्रकरणातील संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी.आणखीन एक आरोपी जेरबंद आरोपींची संख्या सहा.

-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

गांधीनगर:- दोनशे रुपयांच्या पानपट्टीच्या उधारीवरून उचगाव ता करवीर येथील गणेश नामदेव संकपाळ वय 40 याचा गुरुवारी निर्घुण खून करण्यात आला होता. या खुणातील पाच संशयीतांना गांधीनगर पोलिसांनी त्याच दिवशी  अटक केली. त्यातील सहाव्या संशयिताला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याचे नाव सुदेश उर्फ सम्या रमेश माने वय 20 रा डफळे कॉलनी उचगाव ता करवीर असे आहे. या खुणातील एकूण  संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. 

 संशंयीत आरोपींना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कसबा बावडा यांच्या कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सोनावण्यात आली.

दरम्यान विकी संजय जगदाळे, रतन कुमार रमेश राठोड, ओम गणेश माने, सुदेश उर्फ सम्या रमेश माने, सर्व राहणार उचगाव ता.करवीर, रोहन गब्बर कांबळे रा. टेंबलाई नाका, करण राजेंद्र पुरी रा. संभाजीनगर, अशी संशयतांची  नावे आहेत. त्यापैकी यातील दोन संशितावर कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार अध्याप मिळालेले नसून आणि इतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे का हे तपासण्यासाठी गांधीनगर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्याय दंडाधिकारी यांनी सात दिवसाची कोठडी सुनावली. याबाबतचा अधिक तपास गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज  घुले करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.