हेरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल फलकाची विटंबना.
हेरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल फलकाची विटंबना.
हातकणंगले;-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उभा केलेला डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने रात्री फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत माळभागावरील संजय नगर मधील बेकायदेशीर मसिद तात्काळ पाडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेरले इथल्या माळभागावरील संजय नगर मध्ये परिसरातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचा फलक लावला होता. फलक लावत असताना त्या ठिकाणच्या एका मुस्लिम कुटुंबांना फलक लावण्याला विरोध केला होता फलक काढून टाकण्याची धमकी दिली होती. विनाकारण वाद होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी फलकाची जागा बदलली होती. सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक प्राथमिक शाळेजवळ आली असताना दरम्यानच्या काळात तीन वेळा लाईट घालून डिजिटल भडक पाडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस फौज फाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला.पोलिसांनी कार्यकर्त्यांना परत पाठवून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सांगण्यात आले. याबाबत कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण गावामध्ये रात्रभर तणाव निर्माण झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने ग्रामपंचायत वर धडक दिल्या. यावेळी बेकायदेशीर मशीद पाडण्यात यावी, महिलांना लहान मुलींना या ठिकाणी प्रचंड त्रास होत असून याच्यावरही त्वरित कारवाई करावी असे आव्हान करत गाव बेमुदत बंदची हाक दिली.
Comments
Post a Comment