Posts

Showing posts from April, 2023

जयसिंगपूर मधील तंबाखू प्रक्रिया विरुद्ध उच्च -न्यायालयात जण हित याचिका दाखल.

Image
 जयसिंगपूर मधील तंबाखू प्रक्रिया विरुद्ध उच्च -न्यायालयात जण हित याचिका दाखल. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर प्रतिनिधी  राहुल कांबळे -------------------------------- जयसिंगपूर शहरातील नागरिवस्ती मध्ये असणारे तंबाखू प्रोसससिंग युनिटच्या प्रदूषण मुळे नागरिकांच्या आता जीवाशी आले आहे. जयसिंगपूर हे शहर छत्रपती शाहू महाराजांनी तंबाखू विक्री साठी वसवलेले होते. पण काही लोकांनी तंबाखू विक्री न करता तंबाखू प्रोसससिंग सुरु केले आहे.आणि या प्रोसेसिंग युनिट नागरी वस्ती मध्ये शाळेच्या अवती भावती असलल्याने या युनिट मुळे होणाऱ्या प्रदूषणाने लहान मुलाच्या व त्याठिकाणी वास्तवयास असणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे आपला हक्क संघनटेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी सांगितले आहे.   जवळ पासून दहा ते पंधरा वर्षांपासून तेथे वास्तवयास असणाऱ्या नागरिकांनी या व्यापाऱ्यांच्या विरोधात कित्येक वेळा तक्रारी देऊन देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जयसिंगपूर नगरपालिके कडून ना हरकत दाखला लबाडी करून मिळवला असल्याचे समोर आणून देखील नगरपालिका दुर्लक्ष क

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरून पडून रूग्णाचे निधन.

Image
 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  दुसऱ्या मजल्यावरून पडून  रूग्णाचे निधन. सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये  रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने सचिन ज्ञानु बडेकर (वय,४१, राहणार मल्हार पेठ, सातारा) यांचे निधन झाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन ज्ञानु बडेकर हे आजारी असल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दुसऱ्या मजल्यावर असताना रविवारी (दिनांक 23) रोजी ते खिडकीतून बाहेर पडले. या घटनेत ते‌ गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस तपास करीत आहेत.

राजाराम चे कारभारी महाडिकच.

Image
राजाराम चे कारभारी महाडिकच. -------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------------ कोल्हापूर (प्रतिनिधी) :-  छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा, च्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाडिक गटाने आपली सत्ता अबाधित ठेवली. माजी मंत्री सतेज पाटील यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अतिशय आक्रमक भूमिका घेत जोरदार लढत दिली. मात्र 122 गावातील सभासदांनी स्पष्ट बहुमत देत महाडिकगटावर आपला विश्वास कायम ठेवला. या निवडणुकीत पारंपारिक विरोधक मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांचा कलगीतुरा जोरदार गाजला. तर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे एकमेकांना बिंदू चौकात येण्याचा आव्हान देखील खूप गाजले. शेवटच्या टप्प्यात मुन्ना महाडिक आणि महादेवराव महाडिक यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाची प्रचिती निकालातून दाखवून दिली. सतेज पाटील गटाने या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलंच हैराण केलं होतं. मात्र 27 वर्षाची अबाधित सत्ता प्रदीर्घ अनुभव आणि स्वतः महादेवराव महाड

सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी डी वाय एस पी रामेश्वर वैंजणे.अल्पावधीतच लोकप्रिय शिखरावर.

Image
सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी डी वाय एस पी रामेश्वर वैंजणे.अल्पावधीतच लोकप्रिय शिखरावर. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर: प्रतिनिधी नामदेव भोसले ------------------------------- महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीमधल्या लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील बेलूर या छोट्याश्या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेले रामेश्वर वैंजणे यांनी पोलिस दलात आपल्या कार्याचा अगळा-वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमठविला आहे. गोर-गरिबांची कामे तातडीने निस्वार्थी भावनेने मार्गी लावण्यात व त्यांना न्याय देण्यात या कर्तव्य कठोर लातूरच्या भूमी पूत्राचा मोठा हात  आहे.आणि त्यातूनच होरपळून निघाल्यानंतर एक लढवैय्या व्यक्तीमत्व तयार झाले.पोलिस दलाचा अभिमान असल्याने महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावण्याची संधीच ते शोधत होते. आणि अखेर २०१४ साली थेट पोलिस उपअधिक्षक पदाला त्यांनी गवसणी घातली. आणि यशाचा मार्ग सापडला. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक ग्रामीण येथे काम केले. त्यानंतर बुलढाणा, हिंगोली शहर, जयसिंगपूर,  हिंगोली ग्रामीण येथील कित्येक

जयसिंगपूरला अतिक्रमणचा विळखा.नगरपालिका प्रशासनाचे व ट्राफिक पोलीस यांचे दुर्लक्ष : वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळे.

Image
जयसिंगपूरला अतिक्रमणचा विळखा.नगरपालिका प्रशासनाचे व ट्राफिक पोलीस यांचे दुर्लक्ष : वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळे. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर: प्रतिनिधी नामदेव भोसले -------------------------------- जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य क्रांती चौकाबरोबरच शिरोळ-वाडी रोडवर अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे. विनापरवाना डिजिटल फलकांचादेखील यात समावेश आहे. अशा अतिक्रमणाबाबत कोणतीही उपाययोजना नगरपालिकेकडून केली जात नसल्याने विद्रुपीकरणात घडल्याची चर्चा आहे. भर पडत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण फुटपाथवर आणि नागरिक रस्त्यावर, असे काहीसे चित्र पहावयास मिळत आहे. शहराचे मध्यठिकाण असलेला क्रांती चौक अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गुदमरलेला असतो, या चौकात असलेल्या अतिक्रमणाला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे ती काढण्याचे कोणी धाडस दाखवत नाही. वर्षानुवर्षे शिरोळवाडी रोड अतिक्रमण केलेले नगरपालिकेची जागा जणू स्वतःचीच असल्यासारखी तीन तीन चार चार लाख रुपये ला कब्जाधारकांनी विकली गेली आहेत सांगली-कोल्हापूर महामार्

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र बातमीचा इफेक्ट. तात्काळ स्वच्छता सुरू.

Image
 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र बातमीचा इफेक्ट. तात्काळ स्वच्छता सुरू. सातारा;-येथील विलासपुर भागात असलेल्या कारंजकर नगर येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या गटारांची स्वच्छता गेले कित्येक महिने केली नव्हती. याबाबत आमचे सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी लेखी तक्रार दिली होती व त्याचा पाठपुरावा केला होता. विलासपुर भागात असलेल्या या गटारी मुळे शेजारी असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते. तसेच अंगणवाडी शेजारी गटार असल्याने  छोट्या मुलांना पण त्रास होत होता. वारंवार   समक्ष भेटून ही स्वच्छता  होत नाही. पण आमचे सातारा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला व काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे आज नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचारी पाठवून स्वच्छता करून घेतली. यामुळे परिसरातील नागरिकांनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र. या राष्ट्रीय चॅनलचे आभार मानले.

वळीवडे हद्दीत सुरू असणाऱ्या नियमबाह्य व विनापरवाना बांधकामावर कारवाई करा: दलित महासंघ.

Image
 वळीवडे हद्दीत सुरू असणाऱ्या नियमबाह्य व विनापरवाना बांधकामावर कारवाई करा: दलित महासंघ. गांधीनगर:-वळीवडे ता करवीर गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या विनापरवाना , नियमबाह्य  आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करा. अशा मागणीचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने प्रभारी ग्रामसेवक अशोक मुसळे व उपसरपंच शरद नवले यांना देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर निदर्शने करण्यात आली. याचे नेतृत्व दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले. निवेदनात म्हटले आहे की वळीवडे हद्दीत गट नंबर 192/1 शंकरलाल गिरधारीलाल पंजवानी, गट नं.125/5 मनप्रीतसिंह मैदिरता, गट नंबर 183/4 रोशन नंदलाल निरंकारी, गट नंबर 183/2 श्रीचंद द्वारकादास लुलानी, यांच्यासह अन्य काही बांधकाम धारकांनी संबंधित विभागाची परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे बांधकाम सुरू केले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यातील काहींना ग्रामपंचायतीने नोटीसा बजावूनही बांधकाम धारकांनी त्याला केराची टोपली दाखवत नियमबाह्य बांधकामे सुरूच ठेवली आहेत. याकडे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या आठ द

हेरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल फलकाची विटंबना.

Image
  हेरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिजिटल फलकाची विटंबना. हातकणंगले;-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उभा केलेला डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने रात्री फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत माळभागावरील संजय नगर मधील बेकायदेशीर मसिद तात्काळ पाडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.  याबाबत अधिक माहिती अशी की,  हेरले इथल्या माळभागावरील संजय नगर मध्ये परिसरातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाचा फलक लावला होता.  फलक लावत असताना त्या ठिकाणच्या एका मुस्लिम कुटुंबांना फलक लावण्याला विरोध केला होता  फलक काढून टाकण्याची धमकी दिली होती. विनाकारण वाद होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी फलकाची जागा बदलली होती. सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणूक प्राथमिक शाळेजवळ आली असताना दरम्यानच्या काळात तीन वेळा लाईट घालून डिजिटल भडक पाडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घ

शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम!

Image
 शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्याची हनुमान उदय मंडळाची पंरपरा कायम! भणंग : -  जवळ- जवळ ४५ वर्षे शिव जयंती निमित्त शिव ज्योत आणण्याचे परंपरा हनुमान मंडळांनी कायम ठेवली आहे छत्रपती. श्री. शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधले , स्वराज्य निर्माण केले त्याच धरतीवर १९७५ ते १९७६  च्या दरम्यान तोरणा किल्ल्या वरूनच प्रथम शिव ज्योत आणण्यास प्रारंभ केला . प्रतापगड , सिंहगड , रायरेश्वर , अजिंक्यतारा , सज्जनगड  , तुळजापुर , वर्धनगड ' जंजिरा , अश्या अनेक गडावरून शिवज्योत आणून  परंपरागत शिव जयंती उत्सव साजरा केला जातो . त्या काळी ही वेशभूषा व ऐतिहासिक मराठी चित्रपट दाखवले जायचे . तोच आनंद , तोच उत्साह तरुणांचे सळसळते रक्त '  , हनुमान उदय मंडळाचे  कार्यकर्त्यां मध्ये आजही सळसळत आहे  देवगिरी [ छत्रपती संभाजी नगर ] ते भणंग [ राजधानी सातारा ] तीन रात्र दोन दिवस  रात्र धावत अंतर कापून  देवगिरी ते भणंग शिवज्योतीचा प्रवास  केला .   दि . २२ / ०४ / २०२३ रोजी शिवजयंती दिवशी   भणंग मध्ये शिवज्योत दाखल झाली . गावातील महिला वर्गानी शिव ज्योतीचे  पंचाआरती  ने ओवाळून  जय घोषात स्वागत केले ,

अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे काम थांबल्यामुळे आश्चर्य.

Image
 अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे काम थांबल्यामुळे  आश्चर्य. --------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------- नुकताच पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील शेकडो  अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देवुन चोवीस तासाचा अल्टिमेट देवुन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी कारवाई न केल्याने नागरिकांनी महसूल विभागाच्या कारभारावर टीका केली. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील भले मोठे रिसाॅरट सील केल्यानंतर गेले पंधरा दिवस कारवाई  थांबवली आहे. या कारवाया थांबवण्यासाठी गौडबंगाल काय आहे? सर्व कारवाया मॅनेज करण्यात आल्या की काय अशी शंका व चर्चा नागरिकांमध्ये आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिल्यानंतर पंचनामे होवून पाचगणी परिसरातील ११७ अनाधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुक्यातील ४०० पेक्षा जास्त अनाधिकृत बांधकामाच्या याद्या तयार करण्यात आल्या मात्र त्यानंतर ‌ही कारवाई आजतागायत थांबली आहे. गेली पंधरा दिवस प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्या

निधन वार्ता

Image
 निधन वार्ता कै सुरेश सपंत सावंत रा . भणंग ता जावळी येथील रहिवाशी याचे आज अपघाती निधन झाले ते सातारा जिल्हात पेंटीग व्यवसायक म्हणून प्रसिद्ध होत त्यांच्या आकस्मित जाणाने पेटींग व्यवसायाचे भरून न येणारे नुकसान झाले.त्यांच्या मागे पत्नी ' मुलगा ' मुलगी सुना व नातवंडे आहेत .

'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन.

Image
 'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन. नवी मुंबई :- (आयसीएसआय - सीसीजीआरटी), सेक्टर १५, सीबीडी बेलापूर येथे वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (नवी मुंबई) आणि सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिसर्च अँड ट्रेनिंग ह्यांच्या  संयुक्त विद्यमाने 'वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंज' या विषयावर पूर्ण एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वाशी येथील  एमजीएम हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.  या परिसवांदामध्ये (सीएस) विनिता नायर (सीनियर पार्टनर - विनोद कोठारी अँड कंपनी), (सीए) वंदना चौधरी (सहाय्यक व्यवस्थापक - सेबी) आणि डॉ.  (सीएस) किरण सोमवंशी (सहाय्यक - महाव्यवस्थापक, इकॉनॉमिक टाइम्स इंटेलिजन्स युनिट) या वक्त्यांनी वार्षिक सचिवीय अनुपालन अहवाल आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या विविध पैलूंवर महत्वपूर्ण प्रकाश टाकला. यावेळी सदर परिसवांदाचा उपस्थितांनी मनापासून आनंद घेऊन परिसवांदामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला.   आयसीएसआयचे अध

बीट अंमलदार अमरसिंह पावर यांची तात्काळ बदली रद्द करण्यासाठी शिवशक्ती भिम शक्ती एकत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले निवेदन.

Image
 बीट अंमलदार अमरसिंह पावर यांची तात्काळ बदली रद्द  करण्यासाठी शिवशक्ती भिम शक्ती एकत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले निवेदन.  -------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------- शाहूवाडी,:करंजफेण बीट अंमलदारांची बदली रद्द करण्याची मागणी. शिवबाचा मावळा संघटनेचे तालुका  अध्यक्ष किरण कारंडे शिवशक्ती भीमशक्ती  यांच्या  अध्यक्षतेखाली  कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.  की येथील पोलिस ठाणे अंतर्गत करंजफेण बीट अंमलदार अमरसिंह पावरा यांची झालेली बदली रद्द करण्याची मागणी शिवबाचा मावळा, शाहुवाडी तालुका संघटना शिवशक्ती भीमशक्ती व कासारी खोरा ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. तसे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले .  . निवेदनात म्हणालेआहे की वर्षभरापूर्वी करंजफेण येथे आलेले बीट अमलदार श्री. अमरसिंह पावरा हे कर्तव्यात कोणतीही कसूर करत नाहीत. करंजफेण सारख्या दुर्गम भागात रात्री-अपरात्री येवून कर्तव्य बजावतात. ठाण्यापासून ५० किलो

राजाराम सहकारी साखर कारखान्याला महाडिक गटाला 21 जागा जिंकणारच !खासदार मुन्ना महाडिक.

Image
 राजाराम सहकारी साखर कारखान्याला महाडिक गटाला 21 जागा जिंकणारच !खासदार मुन्ना महाडिक. राजाराम सहकार साखर कारखान्याला निवडणूक लागली असल्याने त्यामध्ये 21 ते 21 जागा महाडिक गट जिंकणार असून कोल्हापूर जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री बंटी पाटील यांना एक ही जागा जिंकून देणार नाही असे कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक यांनी  राधानगरी येथील  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतच्या प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले. आज राजाराम सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक लागली होती त्याचे आज मतदान असल्याने कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक यांनी आज राधानगरी कसबा तारळे या मतदार केंद्रावर भेट दिली त्यामध्ये चांगले मतदान झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले  जनता महाडिक गटाच्या पाठीशी राहतील असा विश्वास खासदार मुन्ना महाडिक यांनी व्यक्त केला आहे . राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये माजी मंत्री व आमदार बंटी पाटील यांना एकही जागा जिंकून देणार नाही त्यांचा पराभव अटळ  असून कारखान्यामध्ये 21 जागा जिंकू जिंकणारच असा विश्वास कार्यकर्त्यासमवेत खासदार मुन्ना महाडिक व्यक्त केला यावेळी महाडिक गटाचे उमेदवार गोविंद दादा चौग

सातारा येथील अजंठा चौकात असलेल्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर तसेच मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल.

Image
 सातारा येथील अजंठा चौकात असलेल्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर तसेच मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल. ------------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------------ सातारा येथील गोडोली भागात असलेल्या अजंठा चौकात हाॅटेल प्रितीमागे असणार्या द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करणाऱ्या चौंघावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या भानगडीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, अजंठा चौकात द हिडन कॅफे नावाचा कॅफे असून येथे अश्लील पार्टी चालते अशी पोलीसांना मिळाली. काही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी द हिडन कॅफे मध्ये अश्लील चाळे करीत असल्याचा संशय आल्याने द हिडन कॅफे मध्ये गेले असता काही युवक व युवती व हीडन  कॅफे मध्ये अश्लील चाळे करीत होते. पोलीसांनी अचानक छापा टाकला व याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालक विक्रम निकम वय २२, राहणार शिवाजी चौक, पुसेगाव तालुका खटाव, कॅफे मालक आशुतोष हिंदुराव माने, राहणार जुनी एम.आय.डी.सी.सातारा.तसेच कॅफे मध्ये अश्लील चाळे कर

भणंग:जावली तालुक्यातील मुलें -मुलींही स्पर्धा परिक्षांमध्ये सध्या चमकू लागली आहेत.

Image
 भणंग:जावली तालुक्यातील मुलें -मुलींही स्पर्धा परिक्षांमध्ये सध्या चमकू लागली आहेत. ----------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेतलेल्या कृषी विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया परिक्षेत मौजेओखवडी ता .जावली येथील कु . सायली रविंद्र शेलार हिने महाराष्ट्र राज्यायात १०२ क्रमांकाचे मानांकन मिळवून मोठे यश संपादन करत जावलीच्या शिरपेचात मानाचा तुरा झळकवला आहे .                    कु . सायली शेलार कोणतीही खाजगी शिकवणी न लावता केवळ जिद्द व खडतर परिश्रमाच्या जोरावर घरीच अभ्यास  करून हे उज्वल       यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे . घरात कोणीही उच्चशिक्षित मार्गदर्शक नसताना स्वतःचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारणाऱ्या सायलीचे प्राथमिक शिक्षण जि .प. प्रा . शाळा ओखवडी   येथे तर माध्यमिक शिक्षण केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यालयात झाले .निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी सरपंच कै . दत्रात्रय सदाशिव शेलार ( ड्रायव्हर ) यांची सायली नात आहे .

ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती कोडोली मध्ये संपन्न.

Image
 ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती कोडोली मध्ये संपन्न.  कोडोली  (ता.पन्हाळा) येथे पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी केली जाते. या भव्य शिवजयंती मिरवणूकीचा शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष,छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची (परंपरेनुसार) शिवजयंती साजरी केली जाते.कोडोली येथील वैभवनगर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे,रणजित पाटील,प्रकाश पाटील,अमर पाटील (बाबा),निखिल पाटील,ग्रामपंचायत सदस्य डॉ.प्रशांत जमणे,माणिक मोरे,प्रविण जाधव,प्रविण पाटील,प्रकाश कापरे,महेश पाटील यांच्यासह कोडोली गावातील सर्व तरूण मंडळे, कोडोली गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी चे माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध.

Image
 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी चे माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध. ---------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------- सातारा :परळी गावातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चे 1991/92 चे माजी विद्यार्थी यांनी आजच्या काळात अजूनही ऋणानुबंध जपले आहेत, सर्व मित्र एकत्र येऊन आजही प्रत्येक मित्राचा वाढदिवस साजरा करतात वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांचे सुख दुःख जाणून घेऊन एकमेकाला आधार देतात, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात असे वाढदिवस क्वचितच आपल्याला पहायला दिसतील वाढदिवस म्हणले की पार्टी, एन्जॉय धिंगाणा आपण पहातो परंतु वाढदिवस साजरा कसा करायचा याचा आदर्श या विद्यारत्यांनी ठेवला आहे आज दि 22एप्रिल 2023 रोजी सर्व जुने मित्र एकत्र येऊन श्री सुनील लोटेकर यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री शेखर जांभळे, शशिकांत भाऊ वाईकर, इस्माईल शेख, अनिल फाळके, नितीन कुंभार, रामदास माळी, केशव कदम, संजय सपकाळ, सुरेश गुरव आदी अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते

भावपूर्ण श्रद्धांजली.

Image
 भावपूर्ण श्रद्धांजली. सांगवडे गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री विजयसिह मोहिते (सरकार) यांचे आज पहाटे 4.00 वाजता अल्पशा आजारांने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास  शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि. 26 रोजी सकाळी 9.00 वाजता आहे.  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र / सुपर भारत वृत्तसेवा परिवाराकडून 🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

कासपठारावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश!

Image
 कासपठारावरील अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश! सातारा : - जागतिक वारसा लाभलेल्या कासपठार  निसर्ग सौंदर्य, जैवविविधता संवर्धन करण्याऐवजी बांधकाम नियमित करण्यासाठी  हालचाली राज्य पातळीवर सुरू होत्या. याबाबत राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तक्रारीची दखल घेऊन  कास यवतेश्वर मार्गावरील बेकायदा बांधकामाला पाडण्याचे आदेश सातारा तहसीलदार व प्रांताधिकारी सातारा यांना जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कास‌पठार परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे झाली असून सांडपाणी व्यवस्थापन नाही व त्यामुळे एसटीपी प्लॅन नसल्याने जलप्रदूषण होते आहे. सरकारने कास पठार साठी अधिकृत बांधकाम विषय नियमावली तयार करावी. पुर्वीचे बांधकाम पाडून नव्या बांधकाम नियमानुसार बांधकामांना परवानगी द्यावी. बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासन ठोस भूमिका घेत नसल्याचे अँडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत राष्ट्रीय हरित लवाद यांच्या कडे याचिका दाखल करण्यात आली. सातारा जिल्हाधिकार

दोन दुचाकीस्वारांची पोलिसांसमोर मारामारी.

Image
 दोन दुचाकीस्वारांची पोलिसांसमोर मारामारी. सातारा गोडोली जकात नाका येथील चौकात  एकमेकांच्या गाडींला धक्का लागला म्हणून दोघेही वाहतूक पोलीस वाहतूक बंदोबस्त करण्यासाठी तैनात असताना त्यांच्या समोर भांडत होते.हे प्रकरण हमरीतुमरीवर येवून वाहतूकीस अडथळा निर्माण करीत सायं पाचच्या सुमारास दोघे मोटरसायकल स्वार भांडत होते.या ठिकाणी सातारा वाहतूक पोलीस बंदोबस्त करीत असलेले वाहतूक पोलीस बनगर व रविंद्र माने यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून दोघां मोटारसायकल स्वांरांच्यावर गुन्हा दाखल केला.

शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील रेशन धान्य दुकानदार श्रीकांत शामराव पोवार (डेगळे) यांचे आकस्मित दुःखद निधन.

Image
 शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील रेशन धान्य दुकानदार श्रीकांत शामराव पोवार (डेगळे) यांचे आकस्मित दुःखद निधन. शाहुवाडी: करंजफेण येथील श्रीकांत शामराव पोवार शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वयाच्या ५५व्या वर्षी हृदय विकाराच्या  तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रक्षाविसर्जन रविवार दिनांक २३/०४/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता आहे आहे श्रीकांत पोवार (डेगळे) यांना फ्रंट लाईन न्यूज व दैनिक सुपर भारत टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

राधानगरी संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरी.

Image
 राधानगरी संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्यावतीने शिवजयंती  उत्सव साजरी. ----------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------------------------- राधानगरी येथील संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. संघर्ष तरुण मंडळाच्या वतीने आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्म काळ करण्यात आला यावेळी महिलांच्या वतीने शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणण्यात आला यावेळी अनेक महिला संघर्ष तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर  होते.

कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी विकासाचे केंद्र व्हावे.- गजानन बिडकर.

Image
  कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी विकासाचे केंद्र व्हावे.- गजानन बिडकर. कोल्हापूर :-कोल्हापूर शह र  कुंभार   माल उत्पादक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक लागली असून श्री संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज 22/04/2023 रोजी सकाळी संत गोरा कुंभार वसाहत मधील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. संत शिरोमणी गोरोबाकाका परिवर्तन पॅनल कडून प्रास्ताविक सादर करताना किरण माजगावकर त्यांनी प्रचाराच्या शुभारंभासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत ते असे म्हणाले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले त्यासाठी शाहूपुरी कुंभार गल्लीत मीटिंग बोलवण्यात आली होती परंतु सत्तारूढ संचालकाकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यांचे उत्तर आम्हाला आले की आम्ही आता फार पुढे आले आहोत त्या व्यकत्यावर किरण माजगावकर यांनी मिश्किल टिपणी केली आम्ही पुढे आलो आहोत म्हणजे खुर्चीसाठी काय असं वक्तव्य करतात जमलेल्या सर्व सभासदाने टाळ्यांचा कडकडाट केला. ------------------------------------------------------------------------- निवडणूक लागल

उचगाव खून प्रकरणातील संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी.आणखीन एक आरोपी जेरबंद आरोपींची संख्या सहा.

Image
 उचगाव खून प्रकरणातील संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी.आणखीन एक आरोपी जेरबंद आरोपींची संख्या सहा. ----------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- गांधीनगर:- दोनशे रुपयांच्या पानपट्टीच्या उधारीवरून उचगाव ता करवीर येथील गणेश नामदेव संकपाळ वय 40 याचा गुरुवारी निर्घुण खून करण्यात आला होता. या खुणातील पाच संशयीतांना गांधीनगर पोलिसांनी त्याच दिवशी  अटक केली. त्यातील सहाव्या संशयिताला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याचे नाव सुदेश उर्फ सम्या रमेश माने वय 20 रा डफळे कॉलनी उचगाव ता करवीर असे आहे. या खुणातील एकूण  संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे.   संशंयीत आरोपींना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कसबा बावडा यांच्या कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सोनावण्यात आली. दरम्यान विकी संजय जगदाळे, रतन कुमार रमेश राठोड, ओम गणेश माने, सुदेश उर्फ सम्या रमेश माने, सर्व राहणार उचगाव ता.करवीर, रोहन गब्बर कांबळे रा. टेंबलाई नाका, करण राजेंद्र पुरी रा. संभाजीनगर,