Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला तो मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन.

 पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला तो मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

राधानगरी  प्रतिनिधी

विजय बकरे

-----------------------------------------------

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना.देशात गेली ८ ते ९ वर्ष महागाई ने उच्चांक गाठलेला आहे. अशातच कोराणाचे संकट, नैसर्गिक संकटे सातत्याने देशासमोर उभी आहेत. शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पेट्रोल व डिझेलच्यां  किंमतीमध्ये भरमसाठ वाढ, गॅसची दर वाढ डाळी खाद्य तेल अशा जिवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत . जीएसटी ने सर्वानचेच  कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार आधार सोबत पॅनकार्ड  लिंक करणेसाठी सध्या १०००/- रूपये  दंड लावला आहे. व तो 31 मार्चनंतर १०,०००/- रु होणार आहे.

अगोदरच देशातील गोरगरीब शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक महागाईने मेटाकुटीला आले आहेत असे असताना पॅन कार्ड लिंक साठी जो दंड लावला आहे तो ताबडतोब मागे घेऊन सामान्य जनतेला न्याय द्यावा  अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे हजारो कोटी रुपये बुडवून  मोठ मोठे उदयोजक देशाबाहेर पळून गेले आहेत, त्यांचेवर सरकार कोणतीच कारवाई करत नाही. आणि ते सातत्याने मालामाल होत चालले आहेत, आणि दुसरीकडे देशातील शेतकरी, गोरगरीब मजूर यांची आर्थिक लूट करून सरकार शेतकरी व गरीब यांचे विरोधात कसे आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पॅन कार्ड लिंकसाठी अन्यायी दंड लावलेला आहे तो पूर्णपणे बंद करण्यात यावा आणि महागाई कमी करून सहकार्य करावे अन्यथा तीव्र आंदोलन करणेत येईल. असे निवेदन रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघनेचे महाराष्ट्र राज्य सचिव व राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती  दिलीप कांबळे यांनी निवासी नायब तहसीलदार  सुबोध वायनगणकर यांना देणेत आले. व त्याच्या प्रती ,मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना देणेत आल्या ,यावेळी पिरळ गावचे तंटामुक्त अध्यक्ष  संजय आसनेकर,ग्रामपंचायत सदस्य   केशव येंडे,माहिती अधिकार जिल्हा संघटक निलेश चौगले उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments